[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 16, 2019 | 15:49 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Honour Killing case: ऑनर किलिंगच्या घटना अद्यापही घडत असल्याचं पहायला मिळत आहे. आता पंजाबमध्ये ऑनर किलिंगची एक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Honour Killing in Punjab
Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • ऑनर किलिंगची घटना उघडकीस
  • पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यात घडली धक्कादायक घटना
  • नवदाम्पत्याची गोळ्या झाडून केली हत्या

नवी दिल्ली: देशात शिक्षण, वैज्ञानिक क्षेत्रात भलेही प्रगती झाली असेल मात्र, अद्यापही ऑनर किलिंगच्या घटना थांबताना दिसत नाहीयेत. आता नुकतीच एक ऑनर किलिंगची घटना उघडकीस आली आहे. पंबाजमधील तरन तारन जिल्ह्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. रविवारी ही घटना घडली असून हल्लेखोर हे मृतकांचे नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे.

मृतकांची नावे २१ वर्षीय अमनप्रीत कौर आणि २४ वर्षीय अमनदीप सिंह अमन अशी असल्याची माहिती मिळाली आहे. अमनप्रीत आणि अमनदीप यांनी गेल्यावर्षी मुलगी (अमनप्रीत)च्या नातेवाईकांच्या विरोधात जावून विवाह केला होता. विवाहाला परवानगी दिली नसतानाही अमनप्रीतने विवाह केल्याने तिच्या परिवारातील सदस्य खूपच नाराज होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यातील छब्बल येथे असलेल्या गुरुद्वारा जवळून अमनप्रीत आणि अमनदीप हे दोघे जात होते. यावेळआरोपींनी दोघांचंही अपहरण केलं आणि नौशेहरा ढाला परिसरात नेलं. आपल्या घराजवळ आले असता आरोपींनी दोघांनाही कारमधून बाहेर खेचून काढलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी सर्वप्रथम दोघांनाही कारखाली चिरडलं आणि त्यानंतर दोघांवरही गोळ्या झाडून त्यांची निघृण हत्या केली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी मृतक अमनप्रीतच्या आई-वडिलांना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की, या दाम्पत्याची हत्या त्यांनी नाही तर मुलीच्या चुलत भावांनी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांचीही सुटका केली तर इतर नऊ जणांच्या विरोधात सराइ अमानत खान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये घडला होता असाच प्रकार

अशाच प्रकारची एक घटना काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये घडली होती. पश्चिम बंगालमधील मोंडल दाम्पत्याच्या मुलीचं एका तरुणावर प्रेम होतं. मुलीच्या नातेवाईकांना हे संबंध मान्य नव्हतं. मात्र, आपला विरोध असतानाही मुलगी ऐकत नसल्याने संतप्त झालेल्या तिच्या आई-वडिलांनी मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह गंगा नदीत टाकून दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोंडल दाम्पत्याला अटक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी