India vs Pakistan: पाकिस्तानचे शेपूट वाकडेच; वर्ल्ड कपच्या जाहिरातीत अभिनंदन वर्धमान यांची थट्टा

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 11, 2019 | 20:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Pakistan: क्रिकेट वर्ल्ड कपच्या निमित्तानं पाकिस्तानमधील एका व्हिडिओमध्ये भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावर टिप्पणी करून वादाला तोंड फोडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Wing Commander Abhinandan Varthaman
India vs Pakistan: पाकिस्तानचे शेपूट वाकडेच; वर्ल्ड कपच्या जाहिरातीत अभिनंदन वर्धमान यांची थट्टा 

नवी दिल्ली : वर्ल्ड कपमध्ये येत्या १६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच होत आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाला या मॅचची उत्सुकता लागली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तर ही उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सोशल मीडियावर प्रतिस्पर्धी टीमची टर उडवली जात आहे. भारतातून मौका मौका ही जाहिरात पुन्हा चालवण्यात येत आहे. तर, पाकिस्ताननं एका व्हिडिओमध्ये भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावर टिप्पणी करून वादाला तोंड फोडले आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचवेळी भारतातही या व्हिडिओची दखल घेण्यात आली आहे. यावरून पाकिस्तानला आणि व्हिडिओ तयार करणाऱ्यांना अक्षरशः शिव्या दिल्या जात आहेत. पाकिस्तानातून झालेल्या या कृत्याचे कोणिही समर्थन करणार नाही, अशी स्थिती आहे. या कृत्याला आता भारतीय खेळाडूंनी १६ जून रोजी मैदानातच उत्तर द्यावं, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

व्हिडिओ ३३ सेकंदांचा

वर्ल्ड कपमधील भारत पाकिस्तान मॅचच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून भारताची आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यावरून पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनंदन वर्धमान यांच्यासारख्या मिशा असणारा आणि टीम इंडियासारख्या निळ्या जर्सीतील एक व्यक्ती दाखवण्यात आला आहे. भारताच्या लष्करातील एका धाडसी आणि कर्तृत्ववान अधिकाऱ्यांची थट्टा हा खिलाडूवृत्तीने घेण्यासारखा विषय नसल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना कसे पकडले होते आणि त्यांचा व्हिडिओ कसा करण्यात आला होता. हे या व्हिडिओमध्ये दाखण्यात आलं आहे. त्यात अभिनंदन वर्धमान यांच्यासारखाच चहाचा कपही त्या व्यक्तीच्या हातात देण्यात आला आहे. केवळ ३३ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अभिनंदन यांच्यासारख्या दिसणाऱ्या त्या व्यक्तीला संघातील ११ खेळाडू आणि मैदानावरील रणनितीविषयी विचारण्यात येत आहे. उत्तर न मिळाल्यानंतर त्याला जाऊ दिले जाते. त्यानंतर त्याला थांबवून ‘कप कुठं घेऊन चाललास’, असे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानातील जॅज टीव्हीवरही रिलीज करण्यात आला आहे.

आता सातव्यांदा आमने-सामने

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता. त्यावेळी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाच पाठलाग करताना, भारताचे मिग-२१ विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. विमानाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्यावेळी पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. १ मार्च रोजी त्यांना भारताकडे सुपूर्द करण्यात आले होते. दरम्यान १६ जूनला मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच होणार आहे. यापूर्वी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सहा वेळा आमने-सामने आले आहेत. त्या सहाही सामन्यांत भारतानं पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केलं आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये आजवर भारतावर विजय मिळवता आलेला नाही. वर्ल्ड कपमधील विजयाची ही मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
India vs Pakistan: पाकिस्तानचे शेपूट वाकडेच; वर्ल्ड कपच्या जाहिरातीत अभिनंदन वर्धमान यांची थट्टा Description: India vs Pakistan: क्रिकेट वर्ल्ड कपच्या निमित्तानं पाकिस्तानमधील एका व्हिडिओमध्ये भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावर टिप्पणी करून वादाला तोंड फोडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Loading...
Loading...
Loading...