Arvind Kejriwal: या दोन गोष्टींवर लक्ष द्या; आपल्या देशही अमेरिका, फान्स, इटलीसारखा होईल, केजरीवाल यांचा सरकारला सल्ला

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 15, 2022 | 15:57 IST

Arvind Kejriwal Delhi News: 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (76th Independence Day) कार्यक्रमाला संबोधित करताना, केजरीवाल यांनी विकसित राज्यांच्या तुलनेत देशाच्या मागासलेपणाची कारणे सांगितली.

Arvind  Kejriwal news
अरविंद केजरीवाल 
थोडं पण कामाचं
  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी सोमवारी छत्रसाल स्टेडियमवर ध्वजारोहण केले.
  • गरीब आणि श्रीमंत सर्वांना समान शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
  • स्वातंत्र्यानंतर देशातील सरकारांनी शिक्षण आणि आरोग्याकडे लक्ष दिलं नाही.

नवी दिल्ली: Delhi CM Arvind Kejriwal on Independence Day 2022: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी सोमवारी छत्रसाल स्टेडियमवर ध्वजारोहण केले. 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (76th Independence Day) कार्यक्रमाला संबोधित करताना, केजरीवाल यांनी विकसित राज्यांच्या तुलनेत देशाच्या मागासलेपणाची कारणे सांगितली.

शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींकडे लक्ष न दिल्याने देश मागे पडल्याचे केजरीवाल म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, जर आपण शिक्षण आणि आरोग्याकडेही लक्ष दिले तर आपला देशही विकसित देशांच्या श्रेणीत येईल. गरीब आणि श्रीमंत सर्वांना समान शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा- पूजा करताना करा 'या' रंगाच्या अक्षतांचा समावेश, लक्ष्मी माता होईल प्रसन्न

''शिक्षण आणि आरोग्यासाठी चांगली व्यवस्था करावी लागेल''

जनतेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, 'भारतातील लोकांना देवाने खूप हुशार बनवलं आहे. पण स्वातंत्र्यानंतर देशातील सरकारांनी शिक्षण आणि आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. ज्यामुळे देश अमेरिका, फ्रान्स, इटली, ब्रिटन, जपान आणि स्वीडन सारख्या देशांच्या मागे पडला. मी या श्रीमंत देशांचा अभ्यास केला आहे. मी पाहिले की या देशांनी शिक्षण आणि आरोग्यावर खूप लक्ष दिलं.

या देशांमध्ये गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाला चांगले शिक्षण आणि उत्तम आरोग्य सुविधा मिळत आहेत. मात्र या दोन्ही विषयांकडे लक्ष दिलं गेलं नाही. या श्रीमंत देशांचा विकास होण्यासाठी आपल्याला उत्तम शिक्षण आणि आरोग्याची व्यवस्था करावी लागेल, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी