कोरोना संकटात भारताने केलेल्या कामगिरीचे बिल गेट्सने केले कौतुक

लोकल ते ग्लोबल
Updated May 07, 2022 | 09:10 IST

India COVID death numbers quite a bit lower than rich countries says Bill Gates amid row over WHO excess mortality report : कोरोना संकटात भारताने केलेल्या कामगिरीचे बिल गेट्सने केले कौतुक केले. 'टाइम्स नाउ'चे एडिटर इन चीफ राहुल शिवशंकर यांना दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स यांनी कोरोना संकटात भारताने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

थोडं पण कामाचं
  • कोरोना संकटात भारताने केलेल्या कामगिरीचे बिल गेट्सने केले कौतुक
  • भारताने देशातच लस निर्मिती करण्यावर तसेच सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला
  • भारतात श्रीमंत देशांच्या तुलनेत कोरोना मृत्यूची संख्या कमी

India COVID death numbers quite a bit lower than rich countries says Bill Gates amid row over WHO excess mortality report : नवी दिल्ली : कोरोना संकटात भारताने केलेल्या कामगिरीचे बिल गेट्सने केले कौतुक केले. भारताने देशात कोरोना संकट वाढण्याआधीच वेळेत लॉकडाऊन जाहीर केले. कोविड प्रोटोकॉलचे पालन आणि लसीकरण यावर भर देऊन परिस्थितीवर लवकर नियंत्रण मिळवले. यामुळे श्रीमंत देशांच्या तुलनेत भारतात कोरोना मृत्यूची संख्या कमी आहे; असे बिल गेट्स म्हणाले. 'टाइम्स नाउ'चे एडिटर इन चीफ राहुल शिवशंकर यांना दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स यांनी कोरोना संकटात भारताने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

भारतातील कोरोना मृत्यूच्या संख्येवरून जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकार यांच्यात वाद सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल विशिष्ट निकषांचा वापर करून एक अंदाज जाहीर करतो. या उलट भारत सरकारने प्रत्यक्ष माहिती घेऊन कोरोना संकटाशी संबंधित सर्व आकडेवारीचे अहवाल तयार करून जाहीर केले आहेत. भारतात जनगणना करणारा विभाग कोरोना संदर्भातील रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्या हा अहवाल तयार करत आहे. यामुळे भारताचा अहवाल वास्तविक माहितीवर आधारित असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चुकीच्या निकषांच्या आधारे तयार केलेल्या, अंदाज सांगणाऱ्या अहवालात दुरुस्ती करावी यासाठी भारत सरकारने आपले आक्षेप जागतिक आरोग्य संघटनेला कळवले आहेत. हा वाद सुरू असतानाच बिल गेट्स यांनी भारताचे जाहीर कौतुक केले हे विशेष. 

भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. या देशात वाद होतात आणि साधकबाधक चर्चेअंती वाद शमतात. यामुळे सध्या कोरोना मृत्यूवरून वाद सुरू असला तरी भारताची कोरोना संकटातील कामगिरी श्रीमंत देशांच्या तुलनेत कौतुकास्पद असल्याचे बिल गेट्स म्हणाले.

भारताने देशातच लस निर्मिती करण्यावर तसेच सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला. लसीकरण अतिशय वेगाने केले. यामुळे भारत कोरोना संकटाशी समर्थपणे लढू शकत असल्याचे बिल गेट्स म्हणाले. भारतात शाळा कॉलेजांमध्ये शिकणाऱ्यांचे लसीकरण सुरू आहे. ही नवी पिढी आहे. या पिढीचे लसीकरण म्हणजे दीर्घ काळ कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रतिजैविकांची निर्मिती करणे आहे. अठरापेक्षा कमी वयाच्या पिढीचे जेवढ्या लवकर लसीकरण होईल तेवढ्या लवकर भारत कोरोना संकटावर आणखी नियंत्रण मिळवू शकेल; असे बिल गेट्स म्हणाले.

आम्ही कोरोना लसीकरणावर संशोधन करत आहोत. लस तरुणाईला दिल्यास काय होते याचे परिणाम अभ्यासत आहोत. भारतातील तरुण पिढी या संशोधनात मोठ्या संख्येने सहभागी होईल आणि संशोधन प्रक्रियेला गती येईल, असा विश्वास बिल गेट्स यांनी मुलाखतीत बोलताना व्यक्त केला.

भारताने कोरोना प्रतिबंधक लसची निर्मित आणि वितरण तसेच लसीकर ही संपूर्ण प्रक्रिया प्रभावीरित्या हाताळली. यामुळे भारतात श्रीमंत देशांच्या तुलनेत कोरोना मृत्यूची संख्या कमी आहे. श्रीमंत देशांच्या तुलनेत लसीकरणाच्या बाबतीतली भारताची कामगिरी वाखाणण्याजोगी असल्याचेही बिल गेट्स म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोना मृत्यू संदर्भातला अहवाल जाहीर झाला आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी हा अहवाल फेटाळला आहे. भारताने आपले आक्षेप संघटनेला कळवले आहेत हा प्रश्न यथावकाश संबंधित प्रतिनिधी चर्चेतून सोडवतील, असा विश्वास बिल गेट्स यांनी व्यक्त केला. 

हाऊ टू प्रीव्हेंट द नेक्स्ट पॅनडेमिक या बिल गेट्स यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यानंतर बिल गेट्स यांनी 'टाइम्स नाउ'चे एडिटर इन चीफ राहुल शिवशंकर यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत बिल गेट्स कोरोना संकटाशी संबंधित अनेक प्रश्नांवर बोलले. 

भारतात ५० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे. हे आवश्यक आहे. कोरोना विषाणूमध्ये बदल होत आहेत. विषाणू नवनव्या स्वरुपात मानवी शरीर बाधीत करण्याचा प्रयत्न करत आहे. सुदैवाने भारत हे संकट प्रभावीरित्या हाताळू शकला आहे. पण कोरोनाच्या नव्या लाटा येऊ नये यासाठी लसीकरणावर भर देणे हाच उपाय सध्या उपलब्ध असल्याचे बिल गेट्स म्हणाले.

स्मॉल पॉक्स या महामारीच्या तुलनेत कोरोना संकट वेगाने पसरले तरी या संकटामुळे मृत्यू होण्याची संख्या कमी आहे. जगाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली आहे. नियंत्रण मिळवले तरी कोरोनाचा समूळ नायनाट होणार नाही. यामुळे नागरिकांना कोरोनापासून दीर्घकाळ संरक्षणासाठी ठोस उपाय करावे लागतील. यासाठी संशोधन सुरू आहे. या संशोधनातून ठोस उत्तर सापडेल, अशी आशा बिल गेट्स यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी