चीनचे हेरगिरी करणारे जहाज भारताजवळ

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 08, 2022 | 20:54 IST

India on alert as Chinese spy ship enters Indian Ocean : यूआन वांग 6. हे आहे चिनी जहाजाचे नाव. हेरगिरी करण्यासाठी हे जहाज भारताजवळ आलंय.

थोडं पण कामाचं
  • चीनचे हेरगिरी करणारे जहाज भारताजवळ
  • यूआन वांग 6 चीनचे हेरगिरी करण्यासाठी आलेले जहाज
  • 4 नोव्हेंबरला इंडोनेशिया मार्गे हिंद महासागरात

India on alert as Chinese spy ship enters Indian Ocean : यूआन वांग 6. हे आहे चिनी जहाजाचे नाव. हेरगिरी करण्यासाठी हे जहाज भारताजवळ आलंय. हिंद महासागरात आलंय यूआन वांग 6. भारत लवकरच अग्नि क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे. या चाचणीची जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी आलंय यूआन वांग 6. हे जहाज 4 नोव्हेंबरला इंडोनेशिया मार्गे हिंद महासागरात आलंय. सध्या हे जहाज अंदमान निकोबार बेटांपासून 3500 किलोमीटर लांब उभे आहे. भारताचे संरक्षण तंत्रज्ञान, रडार अशी महत्त्वाची माहिती मिळवण्याचा चिनी जहाजाचा प्रयत्न असेल. याआधी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात उभे राहून चिनी जहाजाने भारताची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी चीनला त्यांचा हेतू साधणे जमले नव्हते. याच कारणामुळे चीनचे हेरगिरी करणारे जहाज पुन्हा एकदा भारताजवळ आले आहे. भारताची हेरगिरी करण्यासाठी चीनने एक उपग्रह अंतराळात पाठवण्याची तयारी पण केलीय. हा उपग्रह 12 नोव्हेंबरला अंतराळात झेपावेल. चिनी जहाज जवळ येताच भारतीय नौदलाने हाय अलर्ट दिला आहे. चिनी तंत्रज्ञानाला भारतीय तंत्रज्ञानाने उत्तर देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जास्तीत जास्त माहिती सुरक्षित राहावी आणि क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी व्हावी यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी