Exclusive: भारताला सर्व प्रकारची मदत देणार अमेरिका

Mike Pompeo interview अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी दिल्लीत २+२ या मंत्रीस्तरिय बैठकीनंतर संयुक्त निवेदनाच्या निमित्ताने चीनला थेट संदेश दिला.

India & US can together deter China says Pompeo
भारताला सर्व प्रकारची मदत देणार अमेरिका 

थोडं पण कामाचं

  • भारताला सर्व प्रकारची मदत देणार अमेरिका
  • स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या लढाईत अमेरिका भारताच्या बाजूने
  • भारत सक्षम आणि लोकशाहीप्रधान तसेच स्वातंत्र्याचे महत्त्व जाणणारा देश

नवी दिल्ली: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo, Secretary of State) यांनी दिल्लीत २+२ या मंत्रीस्तरिय बैठकीनंतर संयुक्त निवेदनाच्या निमित्ताने चीनला (China) थेट संदेश दिला. अमेरिका भारताला सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच संदर्भात टाइम्स नाऊचे (Times Now) मुख्य संपादक (Editor-in-Chief) राहुल शिवशंकर (Rahul Shivshankar) यांनी माइक पॉम्पिओ यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी भारताला सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी अमेरिका सर्व प्रकारची मदत देणार असल्याचा पुनरुच्चार केला. (India & US can together deter China says Pompeo)

भारत (India) आणि अमेरिका (United States of America - USA) संयुक्तपणे चीनला थोपवण्यासाठी अनेक पद्धतीने काम करत आहेत आणि करत राहतील, असे पॉम्पिओ म्हणाले. चिनी गुंतवणूक थोपवण्यासाठी सुरू असलेले उपाय हे चीन विरोधी मोहिमेचे एक ताजे उदाहरण म्हणता येईल. अमेरिका चीन विरोधात टप्प्याटप्प्याने कारवाई करत आहे. ही कारवाई म्हणजे अमेरिकेच्या चीनविरोधी भूमिकेचे स्पष्ट संकेत असल्याचे पॉम्पिओ म्हणाले. जर १९६२ सारखी परिस्थिती निर्माण झाली तर अमेरिका काय करणार असा प्रश्न टाइम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिव शंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांना विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना ट्रम्प प्रशासनाच्या ताज्या निर्णयांतून आपण चीन संदर्भातली अमेरिकेची भूमिका समजून घेऊ शकता, असे पॉम्पिओ यांनी सांगितले. 

आम्हाला परस्परांचा विश्वास वाढवणारा, मैत्री वृद्धिंगत करणारा, प्रामाणिक आणि निःपक्षपाती व्यापार हवा आहे. आम्ही जगातले सर्वात मोठे सैन्य निर्माण केले आहे. हे कार्य अद्याप कोणीही केलेले नाही. या सामर्थ्याचा वापर अमेरिका जगातील लोकशाही व्यवस्था टिकून राहावी आणि देशांचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधीत राहावे यासाठी करत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. अमेरिका भारतासोबत संयुक्तपणे जगाच्या भल्यासाठी काम करू इच्छिते. भारत ही मोहीम यशस्वी करू शकेल असा एक सक्षम आणि लोकशाहीप्रधान तसेच स्वातंत्र्याचे महत्त्व जाणणारा देश आहे. जगात लोकशाहीप्रधान स्वातंत्र्य आणि हुकुमशाही कारभार यांच्यात लढाई सुरू आहे, असे पॉम्पिओ म्हणाले. 

अमेरिका भारताला सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची मदत देण्यास तयार आहे. भारतही अमेरिकेच्या नागरिकांच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य ते करेल, असा विश्वास आम्हाला आहे. लडाखमध्ये तणाव कमी होण्यासाठी सैन्य मागे हटवले जाणे आवश्यक आहे. आम्ही ही बाब ओळखून चीनला त्यांचे सैन्य मागे घेण्यास सांगत आहोत. तेच चीन, भारत आणि जगाच्या हिताचे आहे, असे सूचक विधान त्यांनी केले. आम्हाला तणाव नको आहे, सगळीकडे शांतता हवी आहे, असे पॉम्पिओ यांनी सांगितले.

स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या लढाईत अमेरिका भारताच्या बाजूने उभी आहे. फक्त लडाखच नाही तर चीनमुळे निर्माण होत असलेल्या सर्व आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका भारतासोबत आहे. भारताच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा होईल त्या प्रत्येकवेळी अमेरिका भारतासोबत असेल, असे पॉम्पिओ म्हणाले. त्यांनी गलवानमध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचा गौरव केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी