[VIDEO]: लष्करप्रमुखांचं मोठं वक्तव्य, 'PoK वर मोदींनी निर्णय घ्यावा, भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज'

Government decide on PoK, Army is Ready: भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पीओके संदर्भात गुरुवारी एक मोठं वक्तव्य केलं आहे. पीओकेवर सरकारने निर्णय घ्यावा भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे असं वक्तव्य केलं

Indian army chief general bipin rawat
लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • लष्करप्रमुख बिपीन रावत रावत यांनी केलं मोठं वक्तव्य
  • पीओके संदर्भात लष्करप्रमुखांनी केलं वक्तव्य, भारतीय सैन्य पूर्ण पणे सज्ज
  • यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं, 'आता चर्चा केवळ पीओकेवरच होणार'

नवी दिल्ली: भारतीय लष्करप्रमुख जनलरल बिपीन रावत यांनी पीओके संदर्भात गुरुवारी एक मोठं वक्तव्य केलं आहे. लष्करप्रमुखांनी म्हटलं, 'पाकव्याप्त काश्मीर (PoK)वर भारत सरकारने निर्णय घ्यावा, भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे'. काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं की, पाकिस्तानसोबत आता चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरच होईल. संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता लष्करप्रमुखांनी केलेलं हे वक्तव्य पाकिस्तानसाठी एक इशाराच आहे. 

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे पाकिस्तानच्या पदरी निराशाच आली. पाकिस्तानकडून अनेकदा युद्धाची धमकी देण्यात आली आहे मात्र, भारताने अद्याप संयम पाळला आहे.

संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानला एक प्रकारे इशाराच दिला आहे. लष्करप्रमुखांनी केलेलं वक्तव्य दाखवत आहे की, भारताने पाकिस्तानबाबत आपल्या धोरणात बदल करत आहे. भारताने स्पष्ट केलं आहे की, पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबल्यानंतरच पाकिस्तानसोबत पीओके संदर्भात चर्चा करण्यात येईल.

पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात पुन्हा समावेश करणं हे भारत सरकारचा पुढील अजेंडा आहे. पाकव्याप्त काश्मीरचा भारतात समावेश करण्यासाठी भारत सरकारने कारवाई सुरू केल्याचं दिसत आहे आणि भारत सरकारचा हा निर्णय साहजीकच लष्करप्रमुखांना समजला आहे.

पाकिस्तानकडून गेल्या काही दशकांत काश्मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसेच्या कारवाया करुन भारताचं लक्ष त्याकडेच गुंतवलं होतं. मात्र, आता भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि आपलं संपूर्ण लक्ष पीओकेवर केंद्रीत केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरात राहणारे नाकरिक सुद्धा भारतात राहण्यास उत्सुक आहेत. गेल्या काही वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणारे नागरिक पाकिस्तान विरुद्ध आवाज उठवत असल्याचं पहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...