सॅटेलाईट फोटोतून खरेपणा आला समोर, चीनच्या सैन्याला भारतीय जवानांनी मागे ढकलले

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 30, 2020 | 21:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Times Now वर सॅटेलाईटचे फोटो समोर आले आहेत. यात भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात चीनच्या सैन्याला पिछाडले आहे. या फोटोतून चीनची संपूर्ण पोलखोल झाली आहे.

सॅटेलाईट फोटोतून खरेपणा आला समोर
चीनच्या सैन्याला भारतीय जवानांनी मागे ढकलले 
थोडं पण कामाचं
  • भारतीय सैन्याने चीनच्या सैन्याला गलवान पासून ते गोगरापर्यंत मागे पिछाडले आहे. 
  • चीनने अस्थायी मेडिकल कँप बनवले, यावरून समजते की हिंसक चकमकीदरम्यान अनेक सैनिक मारले गेले. 
  • १५ जूनला भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान हिंसक चकमक झाली 

नवी दिल्ली: भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी(pla)ला ५ किमी मागे ढकलले आहे. नव्या सॅटेलाईट फोटोंवरून ही गोष्ट लक्षात येते. हे फोटो सांगतात की जेथून चीनी आले होते तेथे मागे पोहोचले आहेत. भारतीय सैन्याने गोगरा हॉटस्प्रिंग्समध्ये चीनींना मागे हटण्यासाठी मजबूर केले. फोटोज सांगतात की चीनच्या सैन्याने केवळ गलवान खोरेच(galwan valley) नव्हे तर गोगरा हॉटस्प्रिंग्स भागातही घुसण्याचा प्रयत्न केला.

आयपीसीएसचे सीनियर फेलो, अभिजीत अय्यर मित्रा यांनी टाईम्स नाऊशी बातचीत करताना सांगितले,भारताने चीनला ५ किमी मागे ढकलले आहे. ही काही मजेशीर गोष्ट नव्हे. नव्या फोटोंमध्ये चीनकडून अॅम्ब्युलन्स आणि मर्सिडीजचे फोटो दिसतात जे दाखवतात की १५जूनला तेथे हिंसक चकमक झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी पोहोचले. 

फोटोंमध्ये अॅम्ब्युलन्स आणि आरोग्य सुविधा दर्शवतात की भारतीय सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीमध्ये अनेक चीनचे सैनिक जखमी झाले तर अनेकांचा मृत्यू झाला. पहिल्या सॅटेलाईट फोटोंवरून स्पष्ट दिसते की मेच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चीनच्या सैन्याने तंबू ठोकले होते आणि तेथे उपस्थिती दर्शवली होती. १० जूनच्या जवळपास भारतीय शिविर चीनला खाली करण्यास सांगण्यात आले.

१५ जूनला हिंसक चकमक

१५ जूनला दोन्ही जवानांमध्ये हिंसक चकमक झाली. यात २० भारतीय जवान शहीद झाले. मात्र भारताच्या जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आणि चीनची खेळी मोडून पाडली. चीनने गलवान नदीचा प्रवाही बदलण्याचा प्रयत्न केला. भारताच्या जवानांनी चीनच्या जवानांना मागे पाठवले आणि गलवान नदी पुन्हा वाहू लागली. चीनच्या सैन्याला ५ किमीने मागे ढकलण्यात आले. 

सुरक्षा तज्ञ जीडी बक्क्षी म्हणाले, आमच्या सैन्याने चीनच्या सैन्याला ५ किमी पाठी ढकलत एक उल्लेखनीय काम केले आहे. गलवान सॅटेलाईटचे फोटो सांगतात की भारतीय क्षेत्रातील एक इंच जमीनही चीनच्या ताब्यात नाही. भारतीय सैन्याने चीनच्या सैन्याला प्रतिक्रिया दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी