भारताने हुसकावून लावले चिनी रणगाडे आणि सैनिक

Indian Army thwarted China's attempts and protect territory रणगाड्यांसह चिनी सैनिकांनी २९-३० ऑगस्ट दरम्यान पँगाँग लेक परिसरात भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने हा प्रयत्न हाणून पाडला.

Indian Army thwarted China's attempts and protect territory
भारताने हुसकावून लावले चिनी रणगाडे आणि सैनिक 

थोडं पण कामाचं

  • भारताने हुसकावून लावले चिनी रणगाडे आणि सैनिक
  • रणगाड्यांसह चिनी सैन्याचा पँगाँग लेकमार्गे भारतात घुसखोरीचा प्रयत्न
  • भारताने चिनी सैन्याला हुसकावले

लडाख: जग कोरोना संकटाचा मुकाबला करत असताना चीनला  (China) विस्तारवादाच्या खुमखुमीने पछाडले आहे. आपल्या सर्व शेजारी देशांचे जमतील तेवढे भूभाग बळकावण्याचा तसेच दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) दादागिरी करण्याचा चीनचा प्रयत्न सुरू आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून २९-३० ऑगस्ट दरम्यान चिनी सैनिकांनी पँगाँग त्सो लेक (Pangong Tso Lake) (पँगाँग सो  लेक किंवा पँगाँग लेक) परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (Line of Actual Control - LAC) ओलांडून लडाखमधील (Ladakh) भारताच्या (India) हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनचा हा प्रयत्न भारताने हाणून पाडला. (Indian Army thwarted China's attempts and protect territory)

चीनचे निवडक रणगाडे, २०० सशस्त्र सैनिक मोठा शस्त्रसाठा सोबत घेऊन लडाखमधील भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सावध असलेल्या भारताच्या सैनिकांनी चिनी सैनिकांना एक इंचही पुढे सरकू दिले नाही. तीव्र विरोध होत असल्याचे बघून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याने माघार घेतली. या घटनेनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारताने आणखी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली.

याआधी १५-१६ जून दरम्यान गलवान खोऱ्यात (Galwan Valley Faceoff) चीनच्या सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. चिनी सैनिकांचा प्रयत्न हाणून पाडताना भारताच्या एका कर्नलसह २० सैनिकांनी हौतात्म्य पत्करले होते. भारतीय वीरांनी प्राणघातक संघर्षात चीनचे ३५पेक्षा जास्त सैनिक ठार केले तसेच अनेक चिनी सैनिकांना जखमी केले. चीनने गलवान खोऱ्यातील घुसखोरीचा प्रयत्न सोडून देत माघार घेतली. या नंतर भारताने स्वतःच्या हानीचे आकडे जाहीर केले. मात्र चीनने स्वतःच्या हानीचे अधिकृत आकडे अद्याप जाहीर केलेले नाही. चिनी हानीबाबत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी उपग्रहांच्या फोटोआधारे अंदाज जाहीर केला होता. या घटनेनंतर अडीच महिन्यांनी पुन्हा एकदा भारत-चीन आमनेसामने दिसत आहेत. 

लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर चर्चा सुरू असताना चीनने  केलेल्या कृतीमुळे त्यांच्याविषयीचा अविश्वास आणखी वाढला आहे. भारतीय लष्कराने प्रसिद्धी पत्रक काढून चिनी घुसखोरी हाणून पाडल्याचे जाहीर केले आहे. घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना भारताची हानी झालेली नाही. चीनच्या हानीबाबत कोणतीही माहिती अद्याप हाती आलेली नाही. मात्र भारताच्या तडाख्यामुळे चिनी सैनिकांना त्यांच्यात हद्दीत सुरक्षित ठिकाणापर्यंत माघार घ्यावी लागल्याचे वृत्त आहे.

चिनी रणगाड्यांच्या हालचाली बघून सावध झालेल्या भारताने लष्करी हालचाली वेगाने करण्यासाठी सामान्य वाहनांकरिता श्रीनगर-लेह महामार्ग बंद केला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लष्करी बंदोबस्तात वाढ झाली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्यांचे सुरक्षित ठिकाणी  स्थलांतर केले जात आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवरच्या चर्चेत चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करण्याचे  संकेत भारताने दिले आहेत. 

दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाची एक युद्धनौका दाखल झाली आहे. ही युद्धनौका अमेरिकेच्या नौदलाच्या संपर्कात आहे.अमेरिका आणि भारताने उघडपणे दक्षिण चीन समुद्रातील चिनी दादागिरीला विरोध करण्याचे संकेत दिले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी