National Flag: जगातील सर्वात मोठा तिरंगा दिल्लीत फडकणार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची घोषणा

Indian Flag: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, चार ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये जगातील सर्वात मोठा तिरंगा बनवला जाणार आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी माहिती दिली की, चार ऑगस्ट रोजी हजारो लहान मुले एकत्र येऊन जगातील सर्वात मोठा तिरंगा बनवणार आहेत. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा ७५ वे वर्ष साजरे करत आहे. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्याच्या उत्साहात आणि देशभक्तीच्या रंगात रंगले आहेत. ४ ऑगस्ट रोजी दिल्लीत हजारो मुले एकत्र जमतील आणि जगातील सर्वात मोठा तिरंगा फडकवतील. (Indian flag largest tricolor will be made in delhi watch video)

आम्ही त्या दिवशी शपथ घेऊ की, भारत देश आता थांबणार नाही आणि १३० कोटी भारतीय मिळून जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनवतील. या ७५ वर्षांच्या काळात अनेक देश आपल्याहून पुढे गेले आहेत. आपण का मागे पडलो? आपणही कोणापेक्षा कमी नाही. परमेश्वराने आपल्याला नद्या, समुद्र, पर्वत, खनिजे, औषधी वनस्पती आणि सर्व काही दिले आहे. भारतातील लोक सर्वात मेहनती आणि हुशार आहेत. तरीही आपण का मागे पडलो? या राजकीय नेत्यांवर आणि पक्षांवर देशाला सोडलं तर पुढील ७५ वर्षेही आपण पुढे जाऊ शकणार नाही. आता १३० कोटी जनतेला देशाला पुढे नेण्याची जबाबदारी घ्यावी लागेल असंही केजरीवाल म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी