Indian Railways invited Bids for manufacturing of 200 Vande Bharat trains : नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने २०० वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. नव्याने तयार होणार असलेल्या २०० वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोचची व्यवस्था असेल. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार २०० वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीचा खर्च २६ हजार कोटी रुपये आहे. वंदे भारत ही भारतातील सेमी हायस्पीड ट्रेन आहे.