भारतीय नौदलाच्या सेवेत INS विशाखापट्टणम

INS Visakhapatnam a guided-missile destroyer ship inducted into Indian Navy आज (रविवार २१ नोव्हेंबर २०२१) भारतीय नौदलाच्या सेवेत आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका दाखल झाली. आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका ७५ टक्के स्वदेशी उपकरणांनी सज्ज केली आहे. 

INS Visakhapatnam a guided-missile destroyer ship inducted into Indian Navy
भारतीय नौदलाच्या सेवेत INS विशाखापट्टणम 
थोडं पण कामाचं
 • भारतीय नौदलाच्या सेवेत INS विशाखापट्टणम
 • आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका ७५ टक्के स्वदेशी उपकरणांनी सज्ज
 • भारतात तयार केलेली सर्वाधिक प्रभावी युद्धनौका

INS Visakhapatnam a guided-missile destroyer ship inducted into Indian Navy मुंबई: आज (रविवार २१ नोव्हेंबर २०२१) भारतीय नौदलाच्या सेवेत आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका दाखल झाली. आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका ७५ टक्के स्वदेशी उपकरणांनी सज्ज केली आहे. 

भारतीय नौदलातील सर्वाधिक प्रभावी युद्धनौका असे आयएनएस विशाखापट्टणम या युद्धनौकेचे वर्णन करता येईल. मुंबईत माझगाव गोदीत या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली आहे. या युद्धनौकेची रचना भारतीय नौदलाच्या डिझाइन संचालनालयाने केली आहे. आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट पी १५ बी अंतर्गत तयार केली आहे. 

आयएनएस विशाखापट्टणम युद्धनौकेची वैशिष्ट्ये - 

 1. स्वदेशी DMR 249A दर्जाच्या स्टीलचा वापर करुन तयार केलेली युद्धनौका
 2. चार गॅस टर्बाइन इंजिनवर चालणारी ही १६३ मीटर लांबीची युद्धनौका
 3. युद्धनौका समुद्रात ७४०० टन पेक्षा जास्त पाण्याचे विस्थापन करते
 4. भारतात तयार केलेली सर्वाधिक प्रभावी युद्धनौका
 5. ३२ बराक क्षेपणास्त्र, सहा ब्राह्मोस आणि आठ इतर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज
 6. शत्रूच्या युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुड्या यांच्याशी लढण्यासाठी सक्षम
 7. हवाई हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करत प्रतिहल्ला करण्याची क्षमता
 8. सर्वाधिक वेग ताशी ५५.५६ किमी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी