INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक

INX Media case: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि आपली बाजू मांडली. पी चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सीबीआयची टीम थेट त्यांच्या घरी दाखल होत अटक केलय

P Chidambaram
पी चिदंबरम  |  फोटो सौजन्य: IANS
थोडं पण कामाचं
  • काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना अटक, सीबीआयने केली अटक
  • पी चिदंबरम यांना त्यांच्या राहत्या घरातून सीबीआयने केली अटक
  • पी चिदंबरम यांची चौकशी सुरू

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचं टीमने अटक केली आहे. सीबीआयच्या पथकासोबतच दिल्ली पोलीसही पी चिदंबरम यांच्या घराबाहेर दाखल झाले होते. पी चिदंबरम यांच्या घरी पोहोचलेल्या सीबीआयच्या टीमने त्यांची घरात चौकशी केली. सीबीआयच्या टीमसोबतच ईडीची टीमही चिदंबरम यांच्या घरी दाखल झाली होती. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे.


सीबीआयची टीम ज्यावेळी पी चिदंबरम यांच्या घरी दाखल झाली त्यावेळी चिदंबरम यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला नाही आणि अखेर सीबीआयची टीम भींतीवर उड्यामारून चिदंबरम यांच्या घरात दाखल झाल्याचं दिसून आलं.


पी चिदंबरम यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले आहेत आणि हे कार्यकर्ते आक्रमक झाले असून चिदंबरम यांच्या घराबाहेर गोंधळ घालत असल्याचं दिसत आहे. दिल्ली पोलिसांचं पथक या काँग्रेस कार्यकर्त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात घेरले गेलेले काँग्रेसचे नेते पी चिदंबरम हे बुधवारी रात्री अचानक दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात दाखल झाले. यावेळी पत्रकार परिषद घेत पी चिदंबरम यांनी आपली बाजू मांडली आणि आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. तसेच माझा मुलागाही या प्रकरणात आरोपी नाहीये असं पी चिंदबरम यांनी म्हटलं आहे. 

पी चिदंबरम हे गेल्या २७ तासांपासून संपर्कात नव्हते. त्यानंतर बुधवारी रात्री अचानक ते दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात दाखल होत पत्रकार परिषद घेतली. पी चिदंबरम हे काँग्रेस मुख्यालयात आल्याची माहिती मिळताच सीबीआयची टीम काँग्रेस मुख्यालयाकडे रवाना झाली. मात्र, सीबीआयची टीम काँग्रेस मुख्यालयात दाखल होण्यापूर्वी पी चिदंबरम यांची पत्रकार परिषद संपली होती आणि ते आपल्या घराकडे रवाना झाले होते. त्यानंतर सीबीआयची टीम थेट पी चिदंबरम यांच्या घरी दाखल झाली. 

काय आहे आयएनएक्स मीडिया प्रकरण? 

आयएनएक्स मीडियामध्ये २००७ साली ३०५ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक मिळवली. त्यावेळी पी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. आयएनएक्स मीडियात परकीय गुंतवणूक प्रवर्तन मंडळ (एफआयपीबी) च्या अंतर्गत झालेल्या गुंतवणूकीच्या मंजुरीत अनियमितता आढळली. यसोबतच ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती त्या कंपन्यांमध्ये पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याच्याद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नियंत्रित आहेत. आयएनएक्स मीडियाचे प्रमोटर म्हणून पीटर आणि इंद्राणी मुखर्जी का करत होते. त्यांनी ईडीच्या चौकशीत केलेल्या खुलाशांमुळे पी चिदंबरम अडचणीत आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी