[VIDEO] हे दृश्य तुम्हाला नक्कीच रडवेल, इस्रोचे प्रमुख सिवन यांना अश्रू अनावर 

चांद्रयान २ चंद्रावर सॉफ्ट लॅडिंग करण्यात अपयशी ठरल्यानंतर संपूर्ण देशात निराशेचं दृश्य पाहायला मिळालं. यावेळी इस्त्रोचे प्रमुख के सिवन यांना अश्रू अनावर झाले. त्यांना पंतप्रधान मोदींनी धीर दिला.  

https://img.timesnownews.com/story/1567830144-modihugani.jpg?d=600x422
[VIDEO] हे दृश्य तुम्हाला नक्कीच रडवेल, इस्रोचे प्रमुख सिवन यांना अश्रू अनावर   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात अडचण निर्माण आल्यानं इस्त्रोचे प्रमुख के सिवन हे भावूक झाले.
  • यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धीर दिला आहे
  • हा भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बंगळुरूः  आपण जवळ असूनही दूर झालो... अशीच काहीशी गोष्ट भारताचं सर्वांत महत्वाकांक्षी अंतराळ मिशन चांद्रयान २ ची सोबत घडलं. चंद्रावर उतरताना चंद्रयान -2 'लँडर' विक्रमचा ग्राऊंड स्टेशनशी संपर्क तुटला. यानंतर शास्त्रज्ञांसह देशभरात निराशेचं दृश्य पाहायला मिळालं. या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात अडचण निर्माण आल्यानं इस्त्रोचे प्रमुख के सिवन हे भावूक झाले. त्यांना सिवन यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धीर दिला आहे. हा भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हालाही अश्रू अनावर होतील हे नक्की. 

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक करत त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मोदींनी इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांचं मनोबल वाढवलं. यावेळी के सिवन मोदींनी सोडण्यासाठी गाडीपर्यंत आले. तेव्हा के सिवन यांना आपलं दुःख लपवता आलं नाही आणि ते मोदींना मिठी मारून रडू लागले. मोदींनी यावेळी त्यांची गळाभेट घेऊन त्यांची पाठ थोपटली आणि त्यांनी धीर दिला. 

चंद्राला स्पर्श करण्याचा संकल्प आणखीन मजबूत झाला आहे. आपण खूप जवळ पोहोचलो होतो पण आपल्याला आणखी पुढे जायचं आहे.  जेव्हा यानशी संपर्क तुटला, तो क्षण मी सुद्धा तुमच्यासोबत अनुभवला, आपलं धैर्य आणखी दृढ झालं असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तुमचं तत्वज्ञान प्रेरणा देतात. जिथे शास्त्रज्ञ स्वप्न साध्य करतात. मी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो, असंही मोदी म्हणालेत.

संपूर्ण देश तुमच्यासोबत- पंतप्रधान मोदी

परिणाम आपल्या जागेवर आहे, मात्र मला आणि पूर्ण देशाला तुमच्या प्रयत्नांचा अभिमान आहे. मी रात्री सुद्धा म्हणालो होतो आणि आताही सांगत आहे की देश तुमच्यासोबत आहे. प्रत्येक कठिण काम, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवते आणि यामुळे आपलं भविष्यातील यश निश्चित होते. माझा असा विश्वास आहे की जर ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक कोणी असेल तर ते विज्ञान आहे. विज्ञानात यश मिळत नाही मात्र प्रयोग होतात. प्रत्येक प्रयोग नवीन शक्यतांना जन्म देतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...