पीएसएलव्ही सी-48चे प्रक्षेपण, RISAT-2BR1 पाकवर नजर ठेवण्यासाठी अवकाशात

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 11, 2019 | 19:47 IST

पीएसएलव्ही सी-48सह अर्थ इमेजिंग सॅटेलाईट रिसॅट-२ बीआर १ चे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने आज हे यशस्वी प्रक्षेपण पार पाडले आहे. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले.

थोडं पण कामाचं

  • पीएसएलव्ही सी-48सह अर्थ इमेजिंग सॅटेलाईट रिसॅट-२ बीआर १ चे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे
  • रिसॅट-२ बीआर १ हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट आहे.
  • गगनयान ही इस्त्रोची पुढील महत्त्वाची मोहीम आहे.

इस्त्रोच्या पीएसएलव्ही सी-48चे श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. तसेच पीएसएलव्ही सी-48सह अर्थ इमेजिंग सॅटेलाईट रिसॅट-२ बीआर १ चे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने आज हे यशस्वी प्रक्षेपण पार पाडले आहे. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले आहे.

पीएसएलव्ही हे भारताचे अत्यंत भरवशाचे अवकाशयान प्रक्षेपक आहे. इस्त्रोने पीएसएलव्हीद्वारे प्रेक्षपित केलेले हे ५०वे रॉंकेट असल्याने आज पीएसएलव्हीची हाफ सेंच्युरी झाली आहे. रिसॅट-२ बीआर १ हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट आहे. या उपग्रहाचे वजन ६२८ किलो आहे. RISAT-2B मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. RISAT-2 ची जागा घेण्यासाठी या वर्षाच्या सुरूवातीला पहिल्या RISAT-2B उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते. रिसॅट उपग्रहांची मालिका असून प्रामुख्याने हेरगिरीसाठी या उपग्रहांचा उपयोग करण्यात येणार आहे. रिसॅट-२ बीआर १च्या आधी रिसॅट-2Bचे २२ मे रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते.

भारताच्या या उपग्रहासह ९ विदेशी उपग्रहदेखील पाठवले गेले आहेत. ज्यात अमेरिका (मल्टी-मिशन लेमूर-४ उपग्रह), टेक्नॉलॉजी डिमॉस्ट्रेशन टायवाक-०१२९, अर्थ इमेजिंग १ हॉपसेट, इस्त्राईल (रिमोट सेंसिंग डुचिफट-३), इटली (सर्च एंड रेस्क्यू टायवाक-००९२) आणि जपान ( क्यूपीएस-एसएआर-एक रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट) यांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच इस्त्रोने कार्टोसॅट-३ या अर्थ इमेजिंग सॅटेलाइटचे प्रक्षेपण केले होते. RISAT-2BR1 या उपग्रहासोबत इस्त्रोने अन्य ९ देशांच्या आणखी नऊ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. चांद्रयान-२ ही यंदाच्या वर्षातील इस्त्रोची सर्वात मोठी महत्त्वाकांक्षी मोहिम होती. त्यात विक्रम लॅंडरच्या सॉफ्ट लॅंडिंगचे अपयश वगळता ही मोहीम यशस्वी ठरली. गगनयान ही इस्त्रोची पुढील महत्त्वाची मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत तीन भारतीयांना अवकाशात पाठविण्याचे इस्त्रोचे लक्ष्य आहे.

आतापर्यंत इस्त्रोने ३१० विदेशी उपग्रहांना कक्षेत स्थापित केले आहे आणि ११ डिसेंबरचे मिशन यशस्वी झाल्यास हा आकडा ३१९ एवढा होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी