काहीतरी मोठा हल्ला करण्यासाठी ते आले होते, सुरक्षा दलाच्या सतर्कतेने अनर्थ टळला

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 19, 2020 | 14:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे ११ एके-47 रायफली, ३ पिस्तुले, २९ ग्रेनेड्स आणि इतर शस्त्रास्त्रे, स्फोटके मिळाली आहेत. हे चारही दहशतवादी जैश ए मोहम्मदचे असल्याचा संशय आहे.

Terrorist activities in Jammu and Kashmir
काहीतरी मोठा हल्ला करण्यासाठी ते आले होते, सुरक्षा दलाच्या सतर्कतेने अनर्थ टळला  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मोठ्या हल्ल्याचा कट असल्याचा संशय
  • काश्मीर खोऱ्याच्या दिशेने जात होते संशयित
  • चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी

जम्मू: जम्मू आणि काश्मीरमधल्या (Jammu and Kashmir) जिल्हा विकास परिषदेच्या (District Development Council) आगामी निवडणुका (upcoming elections) दहशतवाद्यांच्या निशाण्यावर (likely on terror radar) आहेत का? जैश ए मोहम्मद (Jaish-e-Mohammad) या आतंकवादी संघटनेचे (terrorist organization) चार संशयित दहशतवादी (4 alleged terrorists) ठार (eliminated) झाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu-Kashmir police) असा संशय व्यक्त केला आहे. हे चार दहशतवादी नागरोटा (Nagrota) येथे जम्मूच्या बाहेरील भागात (outskirts of Jammu) झालेल्या अटीतटीच्या चकमकीत (fierce encounter) ठार झाले होते.

मोठ्या हल्ल्याचा कट असल्याचा संशय

जम्मू विभागाचे इन्स्पेक्टर जनरल मुकेश सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार हे चार दहशतवादी जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांना लक्ष्य करण्याच्या कटात सहभागी असण्याची शक्यता आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या या दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ही पहिलीच व्यापक प्रमाणावरची राजकीय घडामोड असणार आहे. सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “ते एका मोठ्या हल्ल्याची योजना तयार करत असण्याची शक्यता आहे. या प्रकारची कारवाई आणि अटक अभूतपूर्व आहे. येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता आहे. पण आम्ही पुढील तपास करत आहोत.” यावेळी बोलताना त्यांनी असेही सांगितले की ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि स्फोटके होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे ११ एके-47 रायफली, ३ पिस्तुले, २९ ग्रेनेड्स आणि इतर शस्त्रास्त्रे, स्फोटके मिळाली आहेत.

काश्मीर खोऱ्याच्या दिशेने जात होते संशयित

मुकेश सिंग पुढे म्हणाले, “हे दहशतवादी काहीतरी मोठे करण्याच्या उद्देशाने काश्मीर खोऱ्याकडे जात असण्याची शक्यता आहे.” हाती आलेल्या बातम्यांनुसार हे दहशतवादी एका ट्रकने प्रवास करत होते. नागोरता येथील बाण टोल थांब्यावर हा ट्रक थांबवल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली. याबद्दल आयजीपींनी सांगितले, “नेहमीच्या तपासणीदरम्यान पहाटे पाच वाजता एक ट्रक थांबवण्यात आला. ट्रकचा चालक फरार झाला. तपासादरम्यान सीआरपीएफच्या जवानांवर आणि पोलिसांवर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि ग्रेनाईड्स फेकले. यानंतर अधिक फौज बोलावण्यात आली आणि ही चकमक तीन तास चालू राहिली.” अधिकाऱ्यांनी सांगितले की सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना सांबा सेक्टरकडून नागोरता टोल थांब्यादरम्यान दहशतवाद्यांची हालचाल होणार असल्याची विशेष माहिती मिळाली होती. केंद्रीय आरक्षित पोलीस दलाने दिलेल्या स्वतंत्र माहितीनुसार या दहशतवाद्यांना कोंडीत पकडून ठार मारण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे ११ एके-47 रायफली जप्त करण्यात आल्या आहेत.

चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी

या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे चार दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याचा संशय आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जुनीच पद्धत वापरून भारताच्या हद्दीत प्रवेश केला होता. या प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे.

जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुका ८ टप्प्यांमध्ये २८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर यादरम्यान होणार आहे. २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी