Bus Blast Case: उधमपूर बस स्फोट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, काही संशयितांना अटक

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 02, 2022 | 14:01 IST

Udhampur Bus Blast Update: डोमेल चौक (Domel Chowk) येथे पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या रिकाम्या प्रवासी बसमध्ये स्फोट (Blast In Bus) झाला होता. या स्फोटात दोन जण जखमी झाले होते.

थोडं पण कामाचं
  • डोमेल चौक (Domel Chowk) येथे पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या रिकाम्या प्रवासी बसमध्ये स्फोट (Blast In Bus) झाला होता.
  • या स्फोटात दोन जण जखमी झाले होते.
  • पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली. या प्रकरणी काही संशयितांना अटक केली आहे.

श्रीनगर:  Udhampur Bus Blast Case Update: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu & Kashmir) उधमपूर ( Udhampur )  जिल्ह्यातील डोमेल चौक (Domel Chowk) येथे पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या रिकाम्या प्रवासी बसमध्ये स्फोट  (Blast In Bus)  झाला होता. या स्फोटात  दोन जण जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली. या प्रकरणी काही संशयितांना अटक केली आहे.

अधिक वाचा-  ऑफिसच्या टेबलवर 'या' गोष्टी करणं टाळा नाहीतर तर व्हाल कंगाल

काही संशयित ताब्यात 

उधमपूर शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. यासोबतच पोलिसांनी दोन्ही आरोपींवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पहिल्या स्फोटामुळे पोलीस सतर्क झाले आणि दुसऱ्या स्फोटानंतर तपास वेगाने पुढे नेण्यात आला.  पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यासोबतच पोलिसांनी दोन्ही स्फोटांप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. पहिल्या प्रकरणात कलम 16, 17, 20, 23 ULA (P) कायदा 1967(3)(7) स्फोटक पदार्थ कायदा आणि 307, 121, 122 IPC अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी