TRF संगठना आहे तरी काय? ज्याने JK DG Jail Hemant Lohia यांच्या हत्येची स्वीकारली जबाबदारी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 04, 2022 | 19:32 IST

Jammu Kashmir DG Jail Hemant Lohia murder case: जम्मू-काश्मीरचे कारागृह पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली.

JK DG Jail Hemant Lohia: जम्मू काश्मीरचे कारागृह पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येची जबाबदारी दहशतवादी संघटना टीआरएफने स्वीकारली आहे. टीआरएफ आहे तरी काय? टीआरएफचं पूर्ण नाव 'द रेजिस्टेंस फ्रंट' असे आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबानेच ही संघटना बनवली आहे.

टीआरएफ बनवण्याच्या मागे पाकिस्तानमधील आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा आहे. टीआरएफने पूर्ण काश्मीरमध्ये हातपाय पसरुन दहशतवादी कारवाया करत आहे. काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांत टीआरएफचाही हात असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी