जम्मू काश्मीर : नऊ दिवसांत नऊ चकमकी, १३ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये नऊ दिवसांत नऊ चकमकी झाल्या. या चकमकींमध्ये १३ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा पथके यशस्वी झाली.

Jammu Kashmir Terrorism: Big operation against terrorists, 9 days 9 encounters and 13 terrorists
जम्मू काश्मीर : नऊ दिवसांत नऊ चकमकी, १३ दहशतवादी ठार 
थोडं पण कामाचं
  • जम्मू काश्मीर : नऊ दिवसांत नऊ चकमकी, १३ दहशतवादी ठार
  • सुरक्षा पथकांनी २४ तासांत पाच पैकी तीन दहशतवाद्यांना ठार केले
  • आणखी दोन दहशतवाद्यांना पंपोर येथे घेरले आहे आणि चकमक सुरू आहे

श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये नऊ दिवसांत नऊ चकमकी झाल्या. या चकमकींमध्ये १३ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा पथके यशस्वी झाली. ही माहिती काश्मीरचे आयजीपी (Inspector General of Police - IGP / पोलीस महानिरीक्षक) विजय कुमार यांनी दिली. सुरक्षा पथकांनी २४ तासांत पाच पैकी तीन दहशतवाद्यांना ठार केले, असेही ते एका चकमकीची सविस्तर माहिती देताना म्हणाले. Jammu Kashmir Terrorism: Big operation against terrorists, 9 days 9 encounters and 13 terrorists

मागील काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांच्या हत्या झाल्या. दहशतवाद्यांनी सॉफ्ट टार्गेट म्हणून नागरिकांना लक्ष्य केले. पण या घटना घडल्या म्हणून सुरक्षा यंत्रणा कमी पडले असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक संरक्षण देणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. मात्र नागरिकांवरील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी सुरक्षा पथकाने अटकसत्र, चौकशी आणि दहशतवाद्यांविरोधातील मोहीम अशा सर्व कारवायांचे नियोजन तातडीने आणि एकाचवेळी केले; अशी माहिती आयजीपी विजय कुमार यांनी दिली.

ठार झालेल्या १३ दहशतवाद्यांमध्ये प्रामुख्याने लष्कर आणि टीआरएफचे सदस्य आहेत. दहशतवादी उमर मुश्ताक आणि दहशतवादी खुर्शीद या दोघांना ठार केले. यापैकी उमर मुश्ताकने दोन पोलिसांची हत्या केली होती, असेही आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले.

सुरक्षा यंत्रणेने आठ ऑक्टोबर पासून आतापर्यंत नऊ दिवसांत नऊ चकमकींमध्ये १३ दहशतवाद्यांना ठार केले. आणखी दोन दहशतवाद्यांना पंपोर येथे घेरले आहे आणि चकमक सुरू असल्याचे आयजीपी विजय कुमार म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी