कन्हैया कुमार यांचा PM मोदींना सवाल, एकापाठोपाठ तीन मुख्यमंत्री का बदलले?

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 16, 2022 | 11:42 IST

Kanhaiya Kumar targeted Arvind Kejriwal and PM Modi : काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांनी आपचे प्रमुख केजरीवाल यांच्यावर असा आरोप केला की, भाजप आणि आप एकच पक्ष असल्याचे सांगितले

थोडं पण कामाचं
  • गुजरात निवडणुकीत काॅंग्रेसच्या स्टार प्रचारांच्या यादीत कन्हैया कुमार
  • जिग्नेश मेवाणींच्या प्रचार सभेत मोदींवर हल्ला
  • गुजरातमधील तीन मुख्यमंत्री का बदलले

Kanhaiya Kumar speech : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांनी आम आदमी पार्टी (आप) आणि भाजप एकच पक्ष असून ते एकमेकांना फॉलो करत असल्याचे म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP गुजरात विधानसभा निवडणुकीत स्वतःला भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांचा जन्म का काँग्रेस आणि भ्रष्टाचार विरोधातून झाला आहे. (Kanhaiya Kumar's question to PM Modi, Why did three Chief Ministers change in succession?)

अधिक वाचा : Shraddha Murder case: क्राईम सीरिज पाहून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे केले, असं काय आहे या अमेरिकन टीव्ही शोमध्ये? 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव आघाडीवर आहे. या यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा यांच्यासह युवा नेता कन्हैया कुमारचाही समावेश आहे. काल जिग्नेश मेवाणी यांच्या वडगाव येथील प्रचारसभेत भाजप आणि आम आदमी पार्टीवर हल्ला चढवला. यावेळी महागाई, बेरोजगारी, नोकऱ्या अशा अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. 

काय म्हणाले कन्हैया कुमार?

“भगवान रामाचा वनवास 14 वर्षात संपला. तुम्ही 27 वर्षे फक्त एका पक्षाला संधी दिली आणि सर्व निकाल तुमच्यासमोर आहेत. गुजरात मॉडेलचे सत्य गुजराती माणसाला चांगले माहीत आहे. मोरबी येथील घटनेने गुजरातला कलंक लावला आहे आणि गुजरातमधील लोकांनी याचा विचार केला पाहिजे,” ते पुढे म्हणाले.

अधिक वाचा : गाझियाबादमध्ये ATM सेंटरवर भेटू शकतात बोगस बँकर, फेविक्विक ट्रिक वापरून करतात कार्ड घोटाळा

गुजरातने सर्व काही व्यवस्थित आहे. मग एकापाठोपाठ तीन मुख्यमंत्री का बदलले, हे राज्यातील जनतेने विचारले पाहिजे. लोक भाजपवर खूश असतील तर त्यांना निवडू द्या, पण लोकांना बदल हवा असेल तर ते काँग्रेसला संधी देतील, अशी मला आशा आहे.  2022 च्या विधानसभा निवडणुकीत गुजरात "दूरगामी" परिणाम देऊ शकेल.

भाजपला 2017 मध्ये समजले की ते पुढील गुजरात निवडणुका जिंकू शकणार नाहीत, म्हणून त्यांनी 'आप'ला येथे आणले. ए आणि बी टीमचा प्रश्नच नाही, भाजप आणि आप एक टीम आहेत, असा आरोप कन्हैया यांनी केला आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी