उदयपूर : पतीला जसे मारले तशीच 'त्यांची' अवस्था करा; म्हणाली कन्हैयालालची पत्नी

Kanhaiyalal family in the ocean of sorrow, wife said the killers should be in the same condition as her husband : कन्हैयालालची त्याच्याच दुकानात मंगळवार २८ जून २०२२ रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली. ही हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या मारेकऱ्यांची अवस्था तशीच करा जशी माझ्या पत्नीची अवस्था त्यांनी केली, अशी संतप्त प्रतिक्रिया कन्हैयालालच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना दिली.

Kanhaiyalal family in the ocean of sorrow, wife said the killers should be in the same condition as her husband
उदयपूर : पतीला जसे मारले तशीच 'त्यांची' अवस्था करा; म्हणाली कन्हैयालालची पत्नी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उदयपूर : पतीला जसे मारले तशीच 'त्यांची' अवस्था करा; म्हणाली कन्हैयालालची पत्नी
  • कन्हैयालालची त्याच्याच दुकानात मंगळवार २८ जून २०२२ रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली
  • मोहम्मद रियाज अत्तारी आणि गौस मोहम्मद यांनी कन्हैयालालची हत्या केली

Kanhaiyalal family in the ocean of sorrow, wife said the killers should be in the same condition as her husband : राजस्थानमधील उदयपूरच्या कन्हैयालालसाठी मंगळवार हा दिवस अशुभ ठरला. व्यवसायाने टेलर असलेल्या कन्हैयालालची त्याच्याच दुकानात मंगळवार २८ जून २०२२ रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली. ही हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या मारेकऱ्यांची अवस्था तशीच करा जशी माझ्या पत्नीची अवस्था त्यांनी केली, अशी संतप्त प्रतिक्रिया कन्हैयालालच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना दिली.

कन्हैयालालच्या दुकानात मंगळवार २८ जून २०२२ रोजी कपडे शिवून घेण्याच्या निमित्ताने मोहम्मद रियाज अत्तारी आणि गौस मोहम्मद हे दोघे आले. कन्हैयालाल कपडे शिवण्यासाठी मोहम्मद रियाज अत्तारी याचे माप घेत होते. काही मापं घेतल्यानंतर ती लिहून घेण्यासाठी कन्हैय्यालाल थोडे वळले. हीच संधी साधून मोहम्मद रियाज अत्तारी आणि गौस मोहम्मद या दोघांनी कन्हैय्यालालची गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात मारेकऱ्यांना अटक केली आहे. स्थानिक पोलीस हत्येचा तपास करत आहेत. एनआयए या प्रकरणातील दहशतवादी संघटनांचा संबंध तपासत आहे.

कन्हैयालालचे पाकिस्तान कनेक्शन

कन्हैयालालच्या मारेकऱ्यांचे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं तपासातून समोर येत आहे. दावत-ए-इस्लामी नावाच्या पाकिस्तानच्या कराचीमधील कट्टर दहशतवादी संघटनेशी या दोन मारेकऱ्यांचा संबंध असल्याचं उघड झालं आहे. पाकिस्तानमध्येच असलेल्या तहरीक-ए-लब्बैक या कट्टर दहशतवादी संघटनेशी दावत-ए-इस्लामी ही संघटना संलग्न असून उदयपूर प्रकरणातील दोन्ही आरोपी या संघटनेचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी