[VIDEO]: काँग्रेसला मोठा झटका, ८ आमदारांचा राजीनामा

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 06, 2019 | 15:49 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Congress MLA may Resign: कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकार पुन्हा एकदा अडचणीत येणार असल्याचं दिसत आहे. कारण, काँग्रेस आणि जेडीएसचे एकूण ११ आमदार राजीनामा दिला आहे.

Congress-JDS MLA
'हे' ११ आमदार राजीनामा देणार?  |  फोटो सौजन्य: ANI

बंगळुरू: कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस यांची सत्ता आहे. मात्र, आता कर्नाटकातील हे सरकार अडचणीत आलं आहे. काँग्रेस पक्षाचे आठ आणि जेडीएसचे तीन आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे. या एकूण ११ आमदारांमध्ये रमेश जारखोली, एच विश्वनाथ, प्रताप गौडा पाटील यांचा समावेश आहे. काँग्रेस-जेडीएसचे हे ११ आमदार कर्नाटक विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपले राजीनामे सोपवले आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, राजीनामा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या आमदारांचे राजीनामे स्वीकारल्यानंतर कुमारस्वामी यांचं सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी सध्या अमेरिकेत आहेत आणि ते सोमवारी भारतात परत येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या आनंद सिंह यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दिल्लीमध्ये भाजप नेत्यांसोबत झालेल्या भेटीनंतर आनंद सिंह यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसने अनेकदा आरोप केला आहे की, भाजप त्यांचं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे.

 

 

 

 

यानंतर उपमुख्यमंत्री जी परमेस्वर आणि राज्यमंत्री डीके शिवकुमार यांनी काँग्रेसच्या बंगळुरूतील आमदारांची आणि नगरसेवकांची एक बैठक बोलावली आहे.

काँग्रेसचे आमदार रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले की, 'मी अध्यक्षांना आपला राजीनामा देण्यासाठी आलो आहे. मी आपली मुलगी (काँग्रेस आमदार सौम्या रेड्डी) चा निर्णय मला माहिती नाही. मी पक्षाला किंवा हायकमांडला दोष देत नाही. मला वाटतं की काही बाबतीत माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे.'

भाजप खासदार जीव्हीएल नरसिंहा राव यांनी म्हटलं की, काँग्रेस-जेडीएस आघाडीला कर्नाटकच्या नागरिकांनी नाकारलं आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडी करुनही भाजप खासदारांना मतदारांनी निवडून दिलं. हे स्पष्टपणे नागरिकांचं मत दर्शवत आहे. 

कर्नाटक विधानसभेत एकूण २२५ सदस्य आहेत. कर्नाटकमध्ये सध्या असलेल्या सरकारचे एकूण १०८ आमदार आहेत त्यापैकी काँग्रेसचे ६८ आमदार, जेडीएसचे ३५ आमदार आहेत. तर कर्नाटकमध्ये भाजपचे १०५ आमदार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO]: काँग्रेसला मोठा झटका, ८ आमदारांचा राजीनामा Description: Congress MLA may Resign: कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकार पुन्हा एकदा अडचणीत येणार असल्याचं दिसत आहे. कारण, काँग्रेस आणि जेडीएसचे एकूण ११ आमदार राजीनामा दिला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles