Sex Scandal case: सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्याने मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा

alleged involvement in sex tape case, Ramesh Jarkiholi resigned: कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेल्या रमेश जारकीहोळी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सेक्स स्कँडल प्रकरणात नाव आल्याने राजीनामा दिला

Karnataka minister ramesh Jarkiholi resigned from post in the wake of alleged involvement in sex tape case
सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्याने मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा 

बंगळुरू : सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याच्या आरोपानंतर कर्नाटक सरकारमधील भाजपचे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा दिल्यावर रमेश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, एका नियोजित षडयंत्रांतर्गत त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारला कुठल्याही प्रकारच्या अप्रिय परिस्थितीला तोंड द्यावे लागू नये म्हणून मंत्रिमंडळातून राजीनामा देत आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, मी निर्दोष आहे. माझ्या विरोधात जे आरोप लावले गेले आहेत ते खोटे आहेत आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.

सेक्स स्कँडलमध्ये आलं नाव

या प्रकरणात तक्रार दाखल करणाऱ्या दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटलं, या सीडीमधील दृश्यांत मंत्री दिसत आहेत जे कथितपणे एका पीडित मुलीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत आहेत. या प्रकरणी मी तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगी खूप घाबरलेली आहे त्यामुळे तिने या प्रकरणात तक्रार दाखल केली नाहीये.

कर्नाटकमधील जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांची एक कथित सीडी मंगळवारी विविध चॅनल्सने टेलिकास्ट केली. या सीडीमध्ये मंत्री कथितपणे एका तरुणीकडे शारीरिक संबंधाची मागणी करत आहेत. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कलहळ्ळी यांनी बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे आणि पीडित मुलीला सुरक्षा देण्याचीही मागणी केली आहे.

रमेश जारकीहोळी हे पूर्वी जेडीएसमध्ये होते

रमेश जारकीहोळी हे काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ सदस्यांपैकी एक आहेत ज्यांच्या पक्षांतरामुळे कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळले होते. आता रमेश जारकीहोळी यांचं नाव सेक्स स्कँडलमध्ये आल्यानंतर विरोधी पक्षाने म्हटलं, एकीकडे भाजपने स्वत:ला महिलांचं रक्षक मानलं तर दुसरीकडे त्यांचे मंत्री असे घृणास्पद गोष्टी करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी