Kalaburagi, Karnataka : बसला आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

Karnataka Seven feared charred to death as bus catches fire in Kalaburagi : गोव्याहून हैदराबादला चाललेली बस कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातून जात होती. यावेळी अपघात झाला. अपघातानंतर बसमधून पेट्रोल गळती झाली. या गळतीमुळे बसला आग लागली.

Karnataka Seven feared charred to death as bus catches fire in Kalaburagi
बसला आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बसला आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू
  • कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील घटना
  • मृतदेहांची ओळख पटविणे कठीण

Karnataka Seven feared charred to death as bus catches fire in Kalaburagi : गोव्याहून हैदराबादला चाललेली बस कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातून जात होती. प्रवासादरम्यान बस आणि लॉरी यांची टक्कर झाली. या टकरीनंतर बस पुलावरून खाली पडली. अपघातानंतर बसमधून पेट्रोल गळती झाली. या गळतीमुळे बसला आग लागली. आग लागल्यामुळे बसमधील सात जणांचा होरपळू मृत्यू झाला. 

बसमध्ये २९ जण होते. अनेक प्रवासी भाजल्यामुळे कमी-जास्त प्रमाणात जखमी झाले. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

ज्या बसला अपघात झाला त्या बसमध्ये एक चालक गाडी चालवत होता तर दुसरा चालक गाडीतच विश्रांती घेत होता. बसला आग लागली त्यावेळी दोन्ही चालकांसह सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. 

ऑरेंज कंपनीच्या मालकीच्या खासगी बसला आग लागली. अग्नीशमन दलाने माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. आग लागल्यामुळे बसचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती अग्नीशमन दलाने दिली. मोठी आग लागल्यामुळे मृतदेहांची ओळख पटविणे कठीण झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी