कठुआ बलात्कार-हत्या प्रकरण: ३ आरोपींना जन्मठेप तर तिघांना पाच वर्षे कारावास

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 10, 2019 | 17:32 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Kathua Rape and Murder Case Verdict: संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणी विशेष न्यायालयाने निर्णय दिला आहे.

kathua rape murder case verdict
(प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Thinkstock

पठाणकोट: जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोट येथील विशेष न्यायालयाने निर्णय दिला आहे. कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ आरोपींना अटक केली होती. त्यापैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. या सात आरोपींपैकी सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने ग्रामचे प्रमुख सांजी राम, आनंद दत्ता, परवेश कुमार, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया, सुरेंद्र वर्मा आणि हेड कॉन्स्टेबल तिलक राज यांना दोषी ठरवलं आहे. तर एका आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. १७ महिन्यांनंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यापैकी तिघांना जन्मठेपेची शिक्षा तर इतर तिघांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा न्यायायलाने सुनावली आहे.

सांजी राम, परवेश कुमार आणि दीपक खजुरिया या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिलक राज, आनंद दत्ता, सुरेंद्र वर्मा या तिघांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, विशाल याची निर्दोश सुटका करण्यात आली आहे.

कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ आरोपींना अटक केली होती. त्यापैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. आठ आरोपींपैकी सात आरोपींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. तर एका अल्पवयीन आरोपी विरोधात अद्याप खटला सुरू झाला नाहीये. या आरोपीच्या वया संदर्भात जम्मू-काश्मीर उच्च न्यायालया सुनावणी करणार आहे. या प्रकरणाची सुनावणी ३ जून रोजी पूर्ण झाली आणि त्यानंतर आज (१० जून) न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. 

 


 

या प्रकरणी निकाल येणार असल्याने पठाणकोट येथील विशेष न्यायालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे एका आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने जम्मू-काश्मीरच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. पंधरा पानांच्या आरोपपत्रानुसार, गेल्यावर्षी १० जानेवारी रोजी एका आठ वर्षीय चिमुकलीचं अपहरण करुन कठुआ जिल्ह्यातील एका गावात तिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. ही चिमुकली चार दिवस बेशुद्ध होती त्यानंतर आरोपींनी तिची हत्या केली होती. 

उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी बाहेरील राज्यात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी पंजाबमधील न्यायालयात गेल्यावर्षी जून महिन्यात सुरू झाली होती. जम्मू-काश्मीरपासून जवळपास १०० किमी दूर आणि कठुआ पासून ३० किलोमीटर दूर असलेल्या पठाणकोट येथील विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
कठुआ बलात्कार-हत्या प्रकरण: ३ आरोपींना जन्मठेप तर तिघांना पाच वर्षे कारावास Description: Kathua Rape and Murder Case Verdict: संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणी विशेष न्यायालयाने निर्णय दिला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles