कृष्णाच्या जन्मभूमीत दारू आणि मांस विकण्यास बंदी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठी घोषणा केली. कृष्णाच्या जन्मभूमीत अर्थात मथुरेत दारू आणि मांस विकण्यास बंदी घालण्यात आली.

krishna birthplace pilgrimage 10 square km declared as tirthsthal, Uttar pradesh government big decision
कृष्णाच्या जन्मभूमीत दारू आणि मांस विकण्यास बंदी 
थोडं पण कामाचं
  • कृष्णाच्या जन्मभूमीत दारू आणि मांस विकण्यास बंदी
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली मोठी घोषणा
  • धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून मथुरेचा विकास करण्याचा निर्णय

मथुरा: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठी घोषणा केली. कृष्णाच्या जन्मभूमीत अर्थात मथुरेत दारू आणि मांस विकण्यास बंदी घालण्यात आली. कृष्णभक्त ज्या ठिकाणी अनेक वर्षांपासून जन्मस्थळ म्हणून पूजा करत आहेत त्या ठिकाणाला केंद्रबिंदू समजून भोवतालच्या दहा चौरस किलोमीटरच्या परिसरात दारू आणि मांस विकण्यास बंदी घालण्यात आली. यामुळे स्थानिक पालिकेच्या (नगर निगम) २२ वॉर्डमध्ये दारू आणि मांस विकण्यास बंदी लागू होईल. krishna birthplace pilgrimage 10 square km declared as tirthsthal, Uttar pradesh government big decision

उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाचे साधुसंतांनी जोरदार स्वागत केले. धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून मथुरेचा विकास करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीतील एक टप्पा म्हणून दारू आणि मांस विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन मथुरेचा विकास केला जाईल. मथुरेत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाईल; असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले. भविष्याचा विचार करुन विकासाचे नियोजन केले जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले. 

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तर प्रदेशच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अयोध्या, वाराणसी, मथुरा आणि नद्यांच्या संगमाचे ठिकाण असलेल्या प्रयागराज या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरिता आदित्यनाथ सरकार प्राधान्याने काम करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी