[VIDEO] PM Narendra Modi Speech: जम्मू काश्मीरात लवकरच होतील निवडणुका: मोदी

PM Modi: पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं आहे. कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा देशाला संबोधित केलं.यावेळी मोदींनी ३७० कलम रद्द झाल्यानंतरचं काश्मीर कसं असेल याची माहिती दिली.

PM Modi
PM MODI: कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पहिला संवाद  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

 • कलम ३७० ला विरोध असणाऱ्यांचाही सन्मान- मोदी
 • विरोधकांनी जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे
 • नागरिकांना जे हक्काचे मिळायचे होते. ते कोणत्याही आडकाठीशिवाय मिळणार आहे
 • काश्मीरचे लोकं अधिकारापासून वंचित होते- मोदी
 • जम्मू काश्मीरला काही काळासाठी केंद्र शासित प्रदेश ठेवणार आहे

नवी दिल्लीः  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील १३७ कोटी जनतेशी संवाद साधला आणि जम्मू काश्मीरमधील जनतेला आश्वस्त केले की जम्मू काश्मिरात पुन्हा लवकरच निवडणुका होणार असून जनतेचे प्रतिनिधी तुम्हीच निवडणार आहात. सध्या काश्मिरात राष्ट्रपती राजवट लागू आहे. कलम ३७० हटविण्यापूर्वी केंद्र सरकारने लावण्यात आलेला कर्फ्यु अजून काढलेला नाही. त्यामुळे स्थिती सामन्य झाल्यावर पुन्हा निवडणूक होणार असल्याचे संकेत यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. 

ते म्हणाले, यापूर्वी जसे तुमच्यातून निवडून आमदार विधानसभेवर जात होते. तसेच आमदार भविष्यात तुमच्या पसंतची आणि तुमच्यातून निवडून विधानसभेवर जाणार आहेत.  जसे मुख्यमंत्री होते तसेच मुख्ममंत्री असणार आहेत. तुमच्यातून निवडून जम्मू काश्मीरमधील मुख्यमंत्री निवडला जाईल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरच्या जनतेला दिला. 

जम्मू काश्मीरमधील घराणेशाही संपून आता तरूणांनी जम्मू काश्मीरच्या विकासाची धुरा सांभाळायला हवी आणि लोकांमधून निवडून जम्मू काश्मीरचा विकास केला पाहिजे असे आव्हान जम्मू काश्मीरच्या जनतेला यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित केलं. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या जनतेशी संवाद साधला. टीव्हीच्या माध्यमातून मोदींनी हा संवाद साधला. यावेळी भाष्यात मोदींनी कलम ३७० रद्द झाल्यानंतर पुढे काश्मीर आणि लडाख कसं असेल तसंच तिथे कसा विकास होईल याची माहिती देशवासियांना दिली आहे. याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी देशाला एन्टी सॅटेलाइट मिसाइल शक्ती अभियानाबद्दल माहिती देण्यासाठी देशाला संबोधित केलं होतं. २८ मार्च रोजी मोदींनी देशाला संबोधित करत भाष्य केलं. पीएमओ इंडियाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून आजच्या संबोधनाविषयी माहिती देण्यात आली होती. 

पंतप्रधान मोदी यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे :

 1. जम्मू काश्मीरचा विकास हा भारताच्या विकासासाठी हातभार लागणार आहे.
 2. भारतासाठी प्राण देणाऱ्या आणि देशासाठी शौर्य दाखविणाऱ्या जम्मू काश्मीरातील सपूतांची यादी खूप मोठी आहे.
 3. हळूहळू परिस्थिती सामान्य होणार आहे
 4. दहशतवादापासून काश्मीर मुक्त करणार, कलम ३७० चा पाकिस्ताननं शस्त्र म्हणून वापर केला
 5. जम्मू काश्मीर देशाचा मुकूट
 6. कलम ३७० ला विरोध असणाऱ्यांचाही सन्मान
 7. ईदसाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार
 8. चांगले जीवन जगण्याचा हक्क हा जम्मू काश्मीरच्या जनतेचा आहे.
 9. काही जण त्या ठिकाणी विरोध करत आहेत, त्यांना उत्तर देण्याचे काम तेथील काही स्थानिक करत आहे
 10. जम्मू काश्मीर आणि लडाखची चिंता ही देशातली १३० कोटी जनतेची चिंता आहे.
 11. विरोधकांनी जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे.
 12. या विरोधाचा मी सन्मान करतो. त्यांच्या विरोधाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे.
 13. लोकशाहीमध्ये या निर्णयाच्या बाजूने आणि विरोधात आहेत.
 14. काश्मीर आणि लडाख हे उत्तम पर्यटन क्षेत्र बनणार
 15. काश्मीरच्या तंत्रज्ञानाच्या विकासात भर देणार
 16. लडाखमध्ये सोलर पॉवर हब बनू शकते, कोणताही भेदभावाविना विकासाची संधी मिळेल. तेथील लोकांना चांगले हॉस्पिटल मिळतील.
 17. लडाखच्या नागरिकांचा विकास ही सरकारची जबाबदारी
 18. फूट प्रोसेसिंग, एक्स्पोर्टमधील साथीदारांना आवाहन करतो की तेथील हर्बल प्रोडक्ट हे जगभरात पोहचविण्यासाठी हातभार लावा
 19. जम्मू काश्मीरातील प्रोडक्टचा प्रसार जगभरात केला पाहिजे
 20. डिजीटल तंत्रज्ञान जम्मू काश्मीर जनतेचा विकास करण्यास मदत करेल
 21. क्रीडा प्रबोधनी सुरू करणार, काश्मीरमधून आता नवे खेळाडू निर्माण होतील
 22. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सिनेमांचं शूटिंग होणार
 23. बॉलिवूड, टॉलिवूडला आवाहन करतो की, जम्मू काश्मीरात गुंतवणुकीची आणि चित्रीकरणाची उपलब्ध करा.
 24. देशातील नाही तर परदेशातील लोक आता जम्मू काश्मीरात चित्रीकरणात येतील
 25. टुरिस्ट डेस्टिनेशन बनण्याची जम्मू काश्मीरात क्षमता आहे.
 26. आता तरूण जम्मू काश्मीरच्या विकासाची धुरा स्वतः सांभाळा.
 27. संसदेत सरकार देशाच्या भल्यासाठी कायदे करतं- मोदी
 28. काश्मीरचे लोकं अधिकारापासून वंचित होते- मोदी
 29. घराणेशाहींनी काश्मीरी महिलांना नेतृत्व नाकारलं होतं- मोदी
 30. जम्मू काश्मीरात उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करणार
 31. जम्मू काश्मीरात आता पुन्हा निवडणुका होणार आहे. तुम्हांला तुमचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार त्वरित उपलब्ध करून देणार आहोत.
 32. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा पु्न्हा पुनर्स्थापित होणार आहे.
 33. नागरिकांना जे हक्काचे मिळायचे होते. ते कोणत्याही आडकाठीशिवाय मिळणार आहे.
 34. यापूर्वी जसे मुख्यमंत्री होते तसेच यापुढेही असणार आहेत.
 35. तुमचा जनप्रतिनिधी तुमच्यामधूनच येणार, यापूर्वी जसे आमदार होते तसेच आमदार असणार असल्याचे मी काश्मीरच्या जनतेला  विश्वास देतो.
 36. जम्मू काश्मीरात अनेकांना लोकसभेत मतदानाचा अधिकार होता. पण त्या ठिकाणच्या विधानसभा किंवा ग्रामपंचायतीमध्ये मतदानाचा अधिकार नव्हता.
 37. एअरपोर्ट, दळणवळणाचे काम वेगाने करणार आहोत.
 38. जम्मू काश्मीर प्रशासनात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला.
 39. राष्ट्रपती शासन लागू झाल्यापासून तेथील प्रशासन केंद्राशी संलग्न झाले आहे. त्या ठिकाणी गुड गव्हर्नन्सचे चित्र दिसत आहे.
 40. जम्मू काश्मीरला काही काळासाठी केंद्र शासित प्रदेश ठेवणार आहे.
 41. जम्मू काश्मीरात महसूल तूट खूप आहे. केंद्र सरकार सुनिश्चित करणार याचा परिणाम कमी करणार आहे.
 42. लष्करात आणि निमलष्करी दलात स्थानिकांना भरती करण्यासाठी कॅम्प लावणार
 43. जम्मू काश्मीरातील नोकरभरती करणार, त्यामुळे स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध होणार
 44. जम्मू काश्मीरमधील नोकरदारांना देशातील इतर राज्यातील किंवा केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देणार आहोत. त्यात पोलिसांचाही समावेश आहे.
 45. आता कलम ३७० आणि ३५ ए च्या नकारात्मक प्रभावातून जम्मू काश्मीर बाहेर पडेल असा मला विश्वास आहे
 46. लोकांनी फक्त काश्मिरी काही लोकांचा वापर करून घेतला.
 47. राईट टू एज्युकेशनचा फायदा जम्मू कश्मीरच्या जनतेला मिळत नव्हता.
 48. जम्मू काश्मीरचे दीड कोटी लोक केंद्रातील कायद्यांच्या फायद्यापासून वंचित राहत होते.
 49. केंद्र सरकारचे कायदे हे जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नव्हते.
 50. केंद्र सरकारच्या कायद्याचा उपयोग होतो- मोदी
 51. कलम ३७० मुळे काश्मीरी तरुणांचे मोठे नुकसान झाले
 52. जम्मू कश्मीरचा विकास कलम ३७० मुळे रखडला होता.
 53. ४२ हजार निर्दोष लोकांना ३७० मुळे जीव गमवावा लागला
 54. कलम ३७० ने  जम्मू कश्मीरमध्ये भ्रष्टाचाराशिवाय काही दिले नाही.
 55. कलम ३७० मुळे जम्मू कश्मीरच्या लोकांचा काय फायदा झाला हे कोणी सांगू शकत नव्हते
 56. जम्मू काश्मीर आणि लडाखवासियांचे मनपूर्वक अभिनंदन करतो
 57. आता सर्व समान आहेत.
 58. जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण झाले.
 59. एक अशी व्यवस्था, त्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाख याच्या विकासाचा मार्ग सुरू झाला आहे.
 60. एक परिवार म्हणून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
 61. काश्मीरमधील ७० दहशतवादी आग्र्याला हलविण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...