बस नदीत बुडतानाचा थरारक व्हिडिओ, प्रवाशांना केलं असं रेस्क्यू

मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये एक प्रवासी बस पुराच्या पाण्यात अडकली. त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक लोकांनी प्रवाशांना रेस्क्यू केलं. 

MP Flood bus
बस नदीत बुडतानाचा थरारक व्हिडिओ,प्रवाशांना केलं असं रेस्क्यू  |  फोटो सौजन्य: ANI

रतलामः मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यातच पुराच्या पाण्यात एक प्रवासी बस अडकल्यानं एकच गोंधळ उडाला. या बसमधून प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांनी भरलेली बस जेव्हा नदीत अडकली तेव्हा बसमध्ये बसलेले प्रवासी घाबरले. कारण नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक होता. तेव्हा बस नदीच्या पाण्यात वाहून जात होती. 

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळावर तातडीनं दाखल झाले. त्यानंतर जवळपास ५० लोकांना रेस्क्यू करण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार, ही बस रतलामहून रोला गावाच्या कमी उंचाच्या पुलावरून जात होती. त्याचवेळी ही बस नदीमध्ये अडकली. ज्यानंतर एक मोठी दुर्घटना टळली. या बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. 

गेल्या दोन-तीन दिवसांत मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस  सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ रतलाम मंगळवारी शहरात तीन तासात ५.२ इंच पावसाची नोंद झाली आहे. केवळ या शहरात मुसळधार पाऊस झाल्यानं जवळपास ७१ घरांचं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे केवळ रस्ता वाहतूक सेवेची समस्या उद्भवली नसून रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी