जम्मूत दहशतवादी हल्ला टळला, ७ किलो स्फोटके जप्त

Major terror plot foiled in Jammu, 7-kg explosives recovered from crowded bus stop जम्मूत मोठा दहशतवादी हल्ला टळला. सुरक्षा पथकाने जम्मूतील एका बस स्टँडवरुन सात किलो स्फोटके जप्त केली.

Major terror plot foiled in Jammu, 7-kg explosives recovered from crowded bus stop
जम्मूत दहशतवादी हल्ला टळला, ७ किलो स्फोटके जप्त 

थोडं पण कामाचं

  • जम्मूत दहशतवादी हल्ला टळला, ७ किलो स्फोटके जप्त
  • जम्मू काश्मीरमधून दोन दहशतवाद्यांना अटक
  • पुलवामात आजच्याच दिवशी २०१९ मध्ये झालेला मोठा दहशतवादी हल्ला

जम्मू: जम्मूत मोठा दहशतवादी हल्ला टळला. सुरक्षा पथकाने जम्मूतील एका बस स्टँडवरुन सात किलो स्फोटके जप्त केली. पुलवामात आजच्याच दिवशी २०१९ मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाले होते. (Major terror plot foiled in Jammu, 7-kg explosives recovered from crowded bus stop)

जम्मूतील ज्या बस स्टँडवरुन स्फोटके जप्त करण्यात आली तो प्रचंड गर्दीचा एक बस स्टँड आहे. स्फोट झाला असता तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती. मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सुरक्षा पथकाने वेळेवर कारवाई करुन स्फोटके जप्त केली आणि मोठा घातपात टळला.

जम्मू काश्मीरमधून दोन दहशतवाद्यांना अटक

याआधी जम्मूतील कुंजवानी आणि सांबातील बारी ब्रह्मणा या दोन ठिकाणांवरुन प्रत्येकी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केल्याप्रकरणी बारी ब्रह्मणा येथून शनिवारी (१३ फेब्रुवारी) झहूर अहमद राठेर (Zahoor Ahmad Rather) याला अटक करण्यात आली. तसेच ६ फेब्रुवारी रोजी 'लष्कर-ए-मुस्तफा'च्या हिदायतुल्ला मलिक उर्फ हसनैन (Hidayatullah Malik or Hasnain) याला अटक करण्यात आली. अटक केलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची चौकशी सुरू असतानाच रविवारी १४ फेब्रुवारी रोजी जम्मूतील बस स्टँडवरुन सुरक्षा पथकाने स्फोटके जप्त केली.

पुलवामात २०१९ मध्ये झालेला मोठा दहशतवादी हल्ला

पुलवामातून १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सीआरपीएफच्या जवानांना घेऊन ७८ वाहनांचा ताफा निघाला होता. या वाहनांना लक्ष्य करुन आत्मघातकी दहशतवादी एक कार घेऊन वेगाने ताफ्यात घुसला. त्याने सीआरपीएफच्या एका वाहनाला धडक दिली. यावेळी मोठा स्फोट झाला. दहशतवाद्याने कारमध्ये लपवलेल्या स्फोटकांचा स्फोट केला. या स्फोटात आत्मघातकी दहशतवादी ठार झाला तसेच सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला. सीआरपीएफच्या एका वाहनाचा चेंदामेंदा झाला.

पंतप्रधान मोदींनी हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर जवानांना वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुलवामा घटनेची आठवण काढली. त्यांनी पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या भारताच्या जवानांनी त्यांचा पराक्रम वेळोवेळी दाखवून दिला आहे. आम्हाला त्यांच्या या शौर्याचा अभिमान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपले जवान देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

भारताने केलेला एअर स्ट्राईक

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात होता. या प्रकरणी ठोस पुरावे हाती आल्यानंतर भारताने स्व संरक्षणासाठी जैशच्या पाकिस्तानमधील तळावर एअर स्ट्राइक केला होता. भारताच्या लढाऊ विमानांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानमधील एक मोठा तळ नष्ट केला होता. भारताने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथे यशस्वी एअर स्ट्राइक केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी