Mann Ki Baat: ...तेव्हा आत्मनिर्भर भारत बनेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 28, 2021 | 12:41 IST

Mann Ki Baat: 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत आहेत. 

थोडं पण कामाचं

 • 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांसोबत संवाद
 • 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासियांना संबोधित करत असतात 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा हा ७४वा भाग

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 'मन की बात' (Mann Ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करत आहेत. पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमक्या कुठल्या मुद्यांवर भाष्य करत आहेत.

'कॅच द रेन' मोहीम राबवणार

निसर्गाने पाण्याच्या रुपात आपल्याला एक सामूहिक भेट दिली असून त्याचा जपून उपयोग करण्याचीही आली सामूहिक जबाबदारी आहे. भारतात अनेक ठिकाणी मे-जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. आपल्या परिसरात असलेल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यासाठी आणि येणाऱ्या पावसाच्या पाम्याचा संचय करण्यासाठी आपण सर्वजण मिळून आत्तापासून १०० दिवसांची एखादी मोहीम सुरू करू शकतो का? जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलशक्ती अभियान म्हणजेच 'कॅच दर रेन' ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहीमेचा मूलमंत्र असा आहे की, "कॅच दर रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स". या मोहीमेसाठी आत्तापासूनच आपण काम सुरू करुया.

नाशिकच्या स्नेहील यांचा संदेश

एक खूप चांगला संदेश मला नाशिकच्या स्नेहीलजी यांनी पाठवला आहे. स्नेहीलजी यांनी लिहिलं, आपल्या देशात अगणित संशोधक आहेत, त्यांनी दिलेल्या योगदानाशिवाय विज्ञानामध्ये इतकी प्रगती झाली नसती. आपण भारतातल्या संशोधकांची माहितीही जाणून घेतली पाहिजे.

...तेव्हा आत्मनिर्भर भारत बनेल

आत्मनिर्भतेची पहिली अट असते आपल्या देशाच्या वस्तूंबाबत अभिमान बाळगणे. ज्यावेळी प्रत्येक देशवासियाला असा अभिमान वाटेल त्यावेळी देशवासी त्या वस्तूशी जोडले जातील आणि मग आत्मनिर्भर भारत बनेल.

Mann Ki Baat Updates

 1. सर्वांना सण-उत्सवाच्या शुभेच्छा, कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करा, नियमांचे पालन करण्यात कोणताही हलगर्जीपणा करु नका.
 2. माझ्या प्रिय देशवासियांनो आज 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' आहे. आजचा दिवस भारताचे महान वैज्ञानिक, डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी शोधून काढलेल्या 'रमण इफेक्ट'ला समर्पित आहे 
 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संत रवीदास यांच्या आठवणींना उजाळा
 4. आपली संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे
 5. 'कॅच दर रेन' या अभियानाचा मूलमंत्र आहे "कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स" या मोहीमेसाठी आपण आतापासूनच काम सुरू करु 
 6. जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जल शक्ती मोहीम म्हणजेच 'कॅच दर रेन' सुरू करण्यात येणार
 7. पाणी ही एक सामूहिक भेट असून ती भेट सांभाळण्याची जबाबदारीही सामूहिक आहे
 8. पाणी जपून वापरण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे
 9. निसर्गाने पाण्याच्या रुपाने आपल्याला सर्वांना एक सामूहिक भेट दिली आहे
 10. पाणी आपल्यासाठी जीवन आहे
 11. पाणी आहे तर जीवन आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
 12. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला सुरुवात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी