प्रारंभी अयोग्य वाटणारे अनेक निर्णय नंतर राष्ट्र उभारणीत लाभदायक – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कर्नाटकमध्ये (Karnataka) 28,000 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन (Inauguration) आणि पायाभरणी केली. जी विकासकामे 40 वर्षांपूर्वी व्हायला हवी होती, ती पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे, असे मोदी म्हणाले. त्यावेळी ही कामे पूर्ण झाली असती तर बंगळुरूवरचा बोजा वाढला नसता.

 Agneepath: Many decisions are beneficial in nation building - Prime Minister
अग्निपथ : अनेक निर्णय राष्ट्र उभारणीत लाभदायक - पंतप्रधान   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अनेक निर्णय प्रारंभी अयोग्य वाटू शकतात, परंतु नंतर मात्र ते राष्ट्रउभारणीत साहाय्यभूत ठरतात
  • पंतप्रधान मोदींनी कर्नाटकमध्ये 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, 7 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली
  • प्रकल्पांमुळे कर्नाटकातील तरुण, मध्यमवर्ग, शेतकरी, कामगार, उद्योजक यांना नवीन सुविधा, नवीन संधी मिळणार

बंगळूरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कर्नाटकमध्ये (Karnataka) 28,000 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन (Inauguration) आणि पायाभरणी केली. जी विकासकामे 40 वर्षांपूर्वी व्हायला हवी होती, ती पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे, असे मोदी म्हणाले. त्यावेळी ही कामे पूर्ण झाली असती तर बंगळुरूवरचा बोजा वाढला नसता. विकासकामांचे उद्धाघाटन करताना पंतप्रधान मोदींनी अग्निपथचा थेट उल्लेख न करता योजनांविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. 

‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभर असंतोष व्यक्त केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्याचा थेट उल्लेख टाळून सूचक वक्तव्य केले. ‘‘अनेक निर्णय प्रारंभी अयोग्य वाटू शकतात, परंतु नंतर मात्र ते राष्ट्रउभारणीत साहाय्यभूत ठरतात,’’ असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी बंगळूरू येथे भाषण केले. सुधारणांचा मार्ग आपल्याला नवे लक्ष्य आणि नवीन संकल्पाकडे घेऊन जाऊ शकतो. अनेक दशके सरकारी नियंत्रणाखाली असलेले अवकाश आणि संरक्षण क्षेत्र आम्ही मुक्त केले आहे. ‘स्टार्टअप’ आणि ‘इनोव्हेशनचा मार्ग सुलभ नाही. गेल्या आठ वर्षांत देशाला या मार्गावर आणणेही सोपे नव्हते. अनेक निर्णय आणि सुधारणा आज अयोग्य वाटू शकतात, परंतु यथावकाश त्याचे फायदे देशाला मिळू शकतात, असे विधान मोदी यांनी केले. तथापि, त्यांनी आपल्या भाषणात अग्निपथ योजनेचा थेट उल्लेख मात्र केला नाही.

21 व्या शतकातील भारत संपत्ती आणि रोजगार निर्माण करणारा, त्याचबरोबर नवोन्मेषकांचा आहे, तेच देशाची खरी शक्ती आहेत. केंद्र सरकार गेल्या आठ वर्षांपासून त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे मोदी यांनी नमूद केले. दरम्यान, मोदी यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी कर्नाटकमध्ये 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, 7 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली. कोकण रेल्वेच्या 100% विद्युतीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आपण पाहिला आहे. या सर्व प्रकल्पांमुळे कर्नाटकातील तरुण, मध्यमवर्ग, शेतकरी, कामगार, उद्योजक यांना नवीन सुविधा, नवीन संधी मिळणार आहेत. बंगळुरू हे देशातील कोट्यवधी तरुणांच्या स्वप्नांचे शहर आहे. बंगळुरू हे एक भारत - श्रेष्ठ भारत या भावनेचे प्रतिबिंब आहे. बंगळुरूचा विकास हा लाखो स्वप्नांचा विकास आहे. त्यामुळे बंगळुरूची ताकद वाढवण्याचा केंद्र सरकारचा गेल्या 8 वर्षांत सातत्याने प्रयत्न सुरू आहे.

Read Also : शिवसेनेचे चार मंत्रीही नॉट रिचेबल

पीएम मोदी म्हणाले की, दुहेरी इंजिनचे सरकार बंगळुरूची ट्रॉफिकपासून सुटका करण्यासाठी शक्य तितक्या मार्गांवर काम करत आहे. रेल्वे, रस्ता, मेट्रो, अंडरपास, उड्डाणपूल, निर्माण करण्याचे काम करत आहे.  आमचे सरकार बंगळुरूच्या उपनगरी भागांना चांगल्या कनेक्टिव्हिटीने जोडण्यासाठी वचनबद्ध आहे. भारतीय रेल्वे आता वेगवान, स्वच्छ, अधिक आधुनिक, सुरक्षित आणि नागरिकांसाठी अनुकूल होत आहे. आम्ही ट्रेन देशाच्या अशा भागात नेली आहे जिथे कल्पना करणेही कठीण होते. भारतीय रेल्वे आता त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे, जे वातावरण पूर्वी फक्त विमानतळ आणि विमान प्रवासातच मिळत असे.

Read Also : सुरतेतील झटक्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप होणार?

सुधारणांचा मार्ग आपल्याला नवे लक्ष्य आणि नवीन संकल्पाकडे घेऊन जाऊ शकतो. अनेक दशके सरकारी नियंत्रणाखाली असलेले अवकाश आणि संरक्षण क्षेत्र आम्ही मुक्त केले आहे, असेही मोदी म्हणाले. या वेळी त्यांनी बंगळूरू शहराचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘सरकारने सुविधा पुरवल्या आणि हस्तक्षेप कमी केला तर भारतीय तरुण काय करू शकतात, हे या शहराने दाखवून दिले आहे. बंगळूरू हे शहर भारतीय युवकांसाठी स्वप्नांचे शहर आहे. त्यामागे उद्योजकता, नवोन्मेष आणि सरकारी आणि खासगी क्षेत्राचा योग्य उपयोग ही प्रमुख कारणे आहेत.’’
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी