Smriti Irani : नवी दिल्ली : केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (smriti irani) यांनी संसदेत मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १८ वरून २१ करण्याबाबतचे विधेयक(Prohibition of Child Marriage (Amendment) Bill, 2021) मांडले. या वेळी विरोधकांनी गदारोळ केला. एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. मुलगी १८ व्या वर्षी पंतप्रधान निवडू शकते परंतु लग्न करू शकत नाही अशी टीका ओवैसी यांनी केली होती. आज स्मृती इराणी यांनी संसदेत बालविवाह प्रतिबंध विधेयक सादर केले. त्यानुसार मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्यात येणार आहे. संसदेत हे बिल पास झाल्यानंतर हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्यात येईल. तसेच राष्ट्रपतीचे हस्ताक्षर झाल्यानंतर या विधेयकाचे रुपयांतर कायद्यात होईल.