१४ वर्षीय मुलीसोबत छेडछाड करुन बनवला व्हिडिओ, पीडित मुलीची आत्महत्या

एका १४ वर्षीय मुलीची छेड काढून त्याचा व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने आत्महत्या केली आहे. या घटनेप्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

minor gil molested by 3 men in bulandshahr victim ends life
प्रातिनिधीक फोटो 

बुलंदशहर : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीये. उत्तरप्रदेशातील बुलंदशहर (Bulandshahr) जिल्ह्यातून आता एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. बुलंदशह जिल्ह्यात एका १४ वर्षीय मुलीवर सोमवारी संध्याकाळी तिघांनी कथितपणे तिच्यावर लैंगिक अत्याचार (minor gil molested by 3 men) केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने आत्महत्येचं (Suicide) पाऊल उचललं आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबाच्या मते, त्यांच्या गावात राहणाऱ्या तीन जणांनी १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर या घटनेचा व्हिडिओ सुद्धा बनवला. हा व्हिडिओ आरोपींनी सोशल मीडियात शेअर केला होता आणि त्यानंतर पीडित मुलीने आत्महत्या केली आहे.

या संपूर्ण घटनेप्रकरणी बुलंदशहर पोलिसांनी म्हटलं की, पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे आम्ही एफआयआर दाखल केली आहे. तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना अटकही करण्यात येईल. पोलिसांनी पुढे सांगितले की, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सोमवारीच तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाल्यावर पोलिसांची टीम पीडित मुलीच्या घरी दाखल झाले.

बुलंदशहरचे पोलीस अधिकारी गोपाल सिंह यांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबासोबत संपर्क साधण्यात आला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे तिन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस लवकरच या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करतील.

पत्नीवर सामूहिक बलात्कार झाल्याने पतीने केली तिची हत्या

काही दिवसांपूर्वी हरियाणात एका इसमाने आपले जीवन संपवण्याआधी आपल्या पत्नीची हत्या केली. मृत महिला गर्भवती होती आणि दोन युवकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. इतके मोठे पाऊल उचलण्याआधी मजूरी करणाऱ्या या इसमाने एक सूसाईड नोटही लिहिली आहे. यात त्याने उल्लेख केला आहे की दोन अल्पवयीनांनी त्याच्या पत्नीचा सामूहिक बलात्कार केला. हे दोन्ही आरोपी मृतांच्याच गावचे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी