[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 17, 2019 | 15:00 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

MLA car mows down pedestrian: भरधाव वेगात असलेल्या एका कारने पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत पादचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

mla car hit pedestrian jaipal yadav car driver booked
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू 

थोडं पण कामाचं

  • आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक
  • जखमीला मदत करण्याऐवजी आमदार घटनास्थळावरुन निघून गेले
  • अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू
  • हैदराबादमधील महेश्वरम परिसरातील घटना

तेलंगणा: आमदाराच्या भरधाव कारने एका पादचाऱ्याला धडक दिली. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाचे आमदार जयपाल यादव यांच्या कारने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रंगारेड्डी जिल्ह्यातील महेश्वरम भागात रविवारी रात्री घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय व्यक्ती महेश्वरम परिसरात रस्ता ओलांडत होता आणि त्याचवेळी आमदार जयपाल यादव यांच्या कारने या पादचाऱ्याला धडक दिली. आमदार जयपाल यादव यांच्यावर आरोप आहे की, अपघातानंतर त्यांनी जखमी पादचाऱ्याला मदत करण्याऐवजी दुसऱ्या कारमध्ये बसून घटनास्थळावरुन निघून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या गाडीने पादचाऱ्याला धडक दिली त्या गाडीत  टीआरएस आमदार जयपाल यादव, त्यांचा ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक उपस्थित होते.

अपघातानंतर आमदार जयपाल यादव यांनी आपल्याच ताफ्यातील दुसरी गाडी घेतली आणि घटनास्थळावरुन निघून गेले. महेश्वरम परिसरात रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आमदारांच्या विरोधात रास्तारोको करत आंदोलन केलं. आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी मागणी केली होती की, आमदारांनी घटनास्थळी यावं आणि नेमकं काय झालं त्याची माहिती द्यावी. या अपघातानंतर पोलिसांनी आमदार जयपाल यादव यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, एका सर्वसामान्य नागरिकाला अपघात झाल्यानंतर त्याला मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. आमदार साहेबांनी जर या जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन मदत केली असती तर कदाचित त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते.

दरम्यान या अपघातानंतर आमदार जयपाल यादव यांचे नातेवाईक राजू यादव यांनी मिरर नाऊ ला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जखमी व्यक्तीच्या मदतीसाठी ड्रायव्हर, सुरक्षारक्षक तेथेच मदतीसाठी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...