बीफच्या अफवेवरून मुस्लिम जोडप्याला जमावाची मारहाण, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल
Updated May 25, 2019 | 21:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

मध्यप्रदेशातील एक धक्कादायक घटना पुढे आलीय. इथं एका जोडप्यासह तिघांना जमावानं मारहाण केलीय. बीफ नेत असल्याचा आरोप करत काही गोरक्षकांनी तिघांना मारहाण करत धार्मिक घोषणा देण्यास भाग पाडले.

Mob Leeching
बीफच्या अफवेवरून मुस्लिम जोडप्याला मारहाण  |  फोटो सौजन्य: Times Now

भोपालः मध्य प्रदेशातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं एका मुस्लिम जोडप्याला बीफ नेत असल्याच्या आरोपावरुन काही लोकांनी मारहाण केली. तसंच पीडितांना जबरदस्तीनं धार्मिक घोषणा सुद्धा देण्यास भाग पाडलं गेलं. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक केलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिरर नाऊच्या रिपोर्टनुसार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी मुस्लिम जोडप्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत आहेत. व्हिडिओमध्ये पीडित रडत असून आजूबाजूला मदत मागण्यासाठी ओरडताना दिसत आहेत. मात्र त्यांची मदत करण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीय. मुस्लिम जोडप्याला मारहाण करणारे आरोपी एक स्थानिक धार्मिक संस्था ‘श्री राम सेना’चे असल्याचं बोललं जातंय. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी सांगितलं त्यांना हे जोडपं बीफ घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. सोबतच आरोपींनी या जोडप्यावर दुसऱ्या शहरात बीफ विकायला नेत असल्याचा आरोप सुद्धा केलाय.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून पोलिसांनी पाच जणांना अटक केलेली आहे. आरोपीच्या बहिणीनं पीडितांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी मुस्लिम जोडप्यावर बीफची तस्करी करणाऱ्यांची साथ दिल्याचा आरोप केला आहे. मध्यप्रदेशातील सिवनी इथं घडलेली ही घटना कमलनाथ सरकारच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

पोलीस निरीक्षक जी. एस. उईके यांनी सांगितलं की, आरोपींना अटक केली गेलीय. सर्व आरोपींना कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावलीय. मॉब लिचिंगच्या अशा अनेक घटना सध्या समोर येत आहेत. जिथं जमाव कायदा आपल्या हातात घेत, कायदा आणि सुव्यस्थेचं धिंदवडे काढत आहेत. देशात आतापर्यंत अशा अनेक घटना घडलेल्या आहे. मध्यप्रदेशच्या सरकारनं या घटना गंभीर असून अशा घटनेकडे दुर्लक्ष करणार नाही, असं म्हटलंय.

AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेची निंदा केलीय. त्यांनी हा मारहाणीचा व्हिडिओ ट्विट केलाय. ओवेसी यांनी ट्वीट करत म्हटलं, ‘मोदी यांच्या मतदारांनी बनवलेल्या समितीतील हे कथित गोरक्षक मुस्लिमांसोबत अशाप्रकारचा व्यवहार करतात. पीएमओनुसार धर्मनिरपेक्ष असलेल्या या नवीन भारतात आपलं स्वागत आहे.’

दरम्यान, आसाममधील बिश्वनाथ चरैली इथं ७ एप्रिल रोजी अशीच एक घटना घडली होती. जमावाकडून एका 68 वर्षीय मुस्लीम व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. शौकत अली असं या व्यक्तीचं नाव असून बीफ विकत असल्याच्या कारणावरुन त्यांना जमावानं जबर मारहाण केली होती. एव्हढंच नव्हे तर मारहाणीनंतर शौकत अली यांना जबरदस्तीनं डुकराचं मांसही खाऊ घालण्यात आलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बीफच्या अफवेवरून मुस्लिम जोडप्याला जमावाची मारहाण, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल Description: मध्यप्रदेशातील एक धक्कादायक घटना पुढे आलीय. इथं एका जोडप्यासह तिघांना जमावानं मारहाण केलीय. बीफ नेत असल्याचा आरोप करत काही गोरक्षकांनी तिघांना मारहाण करत धार्मिक घोषणा देण्यास भाग पाडले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
[VIDEO]: दसऱ्याला मुंबईसह देशभरातील ६ मंदिरात बॉम्बस्फोटाने उडवण्याची 'जैश-ए-मोहम्मद'ची धमकी
[VIDEO]: दसऱ्याला मुंबईसह देशभरातील ६ मंदिरात बॉम्बस्फोटाने उडवण्याची 'जैश-ए-मोहम्मद'ची धमकी
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ सप्टेंबर २०१९: आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली ते PUBG मुळे तरूणाला वेड लागलं
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ सप्टेंबर २०१९: आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली ते PUBG मुळे तरूणाला वेड लागलं
[VIDEO]: 'हाउडी मोदी' कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प एकत्र, ५०,००० नागरिकांना संबोधित करणार
[VIDEO]: 'हाउडी मोदी' कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प एकत्र, ५०,००० नागरिकांना संबोधित करणार
अजबच! रिक्षा चालकाने सीट-बेल्ट न लावल्याच्या ठपका, वाहतूक पोलिसाने ठोठावला प्रचंड दंड
अजबच! रिक्षा चालकाने सीट-बेल्ट न लावल्याच्या ठपका, वाहतूक पोलिसाने ठोठावला प्रचंड दंड
आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली; 11 जणांचा मृत्यू, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू 
आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली; 11 जणांचा मृत्यू, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू 
PM Narendra Modi birthday LIVE UPDATES: नरेंद्र मोदींकडून सरदार सरोवरची पाहणी
PM Narendra Modi birthday LIVE UPDATES: नरेंद्र मोदींकडून सरदार सरोवरची पाहणी
Rajasthan Floods: पुरामुळे शाळेत अडकले 350 हून अधिक विद्यार्थी आणि 50 शिक्षक 
Rajasthan Floods: पुरामुळे शाळेत अडकले 350 हून अधिक विद्यार्थी आणि 50 शिक्षक