जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा

सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीरमध्ये संघाच्या शाखांचे विस्तृत जाळे उभारण्याची योजना असल्याचे जाहीर केले.

RSS branches should be opened in Jammu Kashmir - Mohan Bhagwat
जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा 

थोडं पण कामाचं

  • जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा
  • जम्मू काश्मीरमध्ये संघाच्या शाखांचे विस्तृत जाळे उभारण्याची योजना
  • सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली घोषणा

श्रीनगर: श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण झाले. कलम ३७०च्या तरतुदी आणि कलम ३५ अ हटवण्यात आले. लोकशाही पद्धतीने घडलेल्या या घटनेला एक वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाची घोषणा केली. जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आलेल्या सरसंघचालकांनी राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा सुरू करण्याची घोषणा केली. जम्मू काश्मीरमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी आणि कायम राहावी यासाठी संघाच्या शाखा सुरू करणार असल्याचे सरसंघचालक म्हणाले. Mohan Bhagwat said in Jammu Kashmir RSS branches should be opened in Jammu and Kashmir spirit of patriotism will be communicated

एक शांततेने राहणारा, आदर्श समाज घडवण्यासाठी संघ कार्यरत आहे आणि यापुढेही हे काम सुरू राहील; असे सरसंघचालकांनी सांगितले. त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये संघाच्या शाखांचे विस्तृत जाळे उभारण्याची योजना असल्याचे सांगितले.

संसदेने बहुमताने पाच ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीर राज्याची नव्याने रचना केली. जम्मू काश्मीर हा विधानसभा असलेला आणि लडाख हा विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्याचा निर्णय झाला. या रचनेनंतर टप्प्याटप्प्याने जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभा अशा चढत्या क्रमाने निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. अद्याप विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी