Nagrota encounter: 'याच' ट्रकमध्ये होते चार दहशतवादी, टोलनाक्यावरील सीसीटीव्हीत ट्रक कैद, पाहा व्हिडिओ 

Nagrota encounter: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने खात्मा केला. हे दहशतवादी एका ट्रकमध्ये होते. ज्या ट्रकमधून हे दहशतवादी प्रवास करत होते तो ट्रक सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Nagrota encounter truck carrying terrorist caught in cctv footage of ban toll plaza
'याच' ट्रकमध्ये होते चार दहशतवादी, ट्रक टोलनाक्यावरील सीसीटीव्हीत कैद  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दहशतवादी असलेल्या ट्रकला बनावट नंबर प्लेट होती 
  • ट्रकमधून ११ एके४७ रायफल्स, तीन पिस्तूल, २९ ग्रेनेड आणि इतर शस्त्रसाठा जप्त, दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते 
  • घटनास्थळावरुन पाकिस्तान निर्मित औषधेही जप्त

नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी (Terrorist) वापरलेला पाकिस्तानी 'टेरर ट्रक' सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (truck carrying terrorist caught in cctv footage)  झाला आहे. सीससीटीव्ही फुटेजमध्ये ट्रकवर दिसत असलेली नंबर प्लेट ही बनावट होती. गुरुवारी (१९ नोव्हेंबर २०२०) रोजी पहाटेच्या सुमारास भारतीय सैन्याकडून तपासणी सुरू होती तेव्हा दहतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी सैन्याच्या पूर्ण पाठिंब्याने या दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती.

ट्रकवर बनावट नंबर प्लेटचा वापर 

दहशतवाद्यांना घेऊन एक ट्रक येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सैन्य दल हाय अलर्टवर होते. त्यानुसार सैन्याकडून तपासणी सुद्धा सुरू करण्यात आली. जम्मू जिल्ह्यातील नगरोटा परिसरात असलेल्या बन टोल नाक्याजवळ गुरुवारी पहाटे दहशतवादी असलेला ट्रक आढळून आला. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देत चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाई दरम्यान एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यावर घटनास्थळावरुन सैन्य दलाने ११ एक रायफल्स, तीन पिस्तूल, २९ ग्रेनेड आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. इतका मोठा शस्त्रसाठा हेच दर्शवत आहे की, दहशतवादी मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत होते आणि भारतीय सैन्याने त्यांचा कट उधळून लावला आहे. 

दहशतवाद्यांकडून पाकिस्तानात बनवलेल्या औषधांचा साठाही होता जो घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला आहे. यावरुन हे स्पष्ट होत आहे की, या हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका उघड होत आहे.

२०१८ पासून जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना ट्रकचा वापर मोबाइल बंकर म्हणून करत आहे. या दहशतवाद्यांचा खात्मा केल्यावर भारतीय लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे म्हणाले, पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवाद्यांसाठी हा संदेश अगदी स्पष्ट आहे की जो कोणी दहशतवादी कारवाया करणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि चोख प्रत्युत्तर देण्यात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी