VIDEO: परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपती बालाजीच्या चरणी

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 09, 2019 | 21:15 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Modi in Tirupati: पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौरा पूर्ण करुन भारतात परतले. मायदेशी परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. नरेंद्र मोदींनी जनसभेलाही संबोधित केलं

narendra modi at tirupati balaji temple
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपती बालाजीच्या चरणी  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली: मालदीव आणि श्रीलंका या दोन देशांच्या परदेश दौऱ्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी परतले. त्यानंतर नरेंद्र मोदी हे आंध्रप्रदेशात पोहोचले. तेथे पोहोचल्यावर मोदींनी तिरुपती येथे जनसभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी म्हटलं की, मला अनेकदा तिरुपतीला येण्याचं भाग्य लाभलं आहे, आता आज पुन्हा एकदा नवी सरकार बनवल्यानंतर परमेश्वराच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.

'आम्ही सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या कामावर विश्वास ठेवणारी लोक आहोत. जेव्हा नगरपालिका निवडणुका सुद्धा जिंकत नव्हतो तेव्हा सुद्धा भारत माता की जय च्या घोषणा देत काम केलं. त्यानंतर आता आम्हाला देशाची सेवा करण्याची आणखीन एक संधी आम्हाला मिळाली आहे' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

तिरुपती येथे पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात बालाजीचं दर्शन घेतलं.

निवडणुका जिंकल्याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, निवडणुका जिंकायच्या आहेत, निवडणुकांच्या दरम्यान मैदानात निवडणुका करायच्या असतात. मात्र, जनतेची मनं देखील जिंकायची आहेत आणि आपल्याला वर्षाच्या ३६५ दिवस हे काम सुरूच ठेवायचं आहे. आपल्याला सरकार सुद्धा बनवायचं आहे आणि देश सुद्धा बनवायाचा आहे. या सर्वांसाठी सरकारचा उपयोग सुद्धा देश बनवण्यासाठी व्हायला हवा.

विरोधी पक्षांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, काही लोक निवडणूक निकालांच्या झटक्यातून अद्याप बाहेर आलेले नाहीयेत. ही त्यांची अडचण आहे. आपल्यासाठी निवडणुकांचा अध्याय संपला आहे आणि १३० कोटी देशवासीयांची सेवा करण्याचा अध्याय आता सुरू झाला आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपती बालाजीच्या चरणी Description: Modi in Tirupati: पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौरा पूर्ण करुन भारतात परतले. मायदेशी परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. नरेंद्र मोदींनी जनसभेलाही संबोधित केलं
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles