सिद्धूसाठी इमरान खान 'बडा भाई'

Navjot Sidhu Calls Pakistan PM "Bada Bhai" पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू करतारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू होताच शनिवारी गुरुद्वारा करतारपूर साहिब येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी बोलताना सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा 'बडा भाई' असा उल्लेख केला. 

Navjot Sidhu Calls Pakistan PM
सिद्धूसाठी इमरान खान 'बडा भाई' 
थोडं पण कामाचं
  • सिद्धूसाठी इमरान खान 'बडा भाई'
  • सिद्धू आणि इमरान खान यांच्यात वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध
  • सिद्धू यांच्या या वक्तव्यावरुन भारतात उलटसुलट प्रतिक्रिया

Navjot Sidhu Calls Pakistan PM "Bada Bhai", Navjot Singh Sidhu visit Kartarpur करतारपूर: पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू करतारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू होताच शनिवारी गुरुद्वारा करतारपूर साहिब येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी बोलताना सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा 'बडा भाई' असा उल्लेख केला. 

याआधी पाकिस्तानमध्ये सिद्धू यांचे स्वागत झाले. दर्शन घेतल्यानंतर सिद्धू यांनी करतारपूर योजनेचे मुख्य व्यवस्थापन अधिकारी मोहम्मद लतीफ यांच्याशी बातचीत केली. याप्रसंगी बोलताना सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा 'बडा भाई' असा उल्लेख केला.

नवजोत सिंह सिद्धू २०१८ मध्ये इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. सिद्धू आणि इमरान खान यांच्यात वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर करतारपूरमध्ये बोलताना सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा 'बडा भाई' असा उल्लेख केला. सिद्धू यांच्या या वक्तव्यावरुन भारतात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

करतारपूर कॉरिडॉर खुला झाल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांनी गुरुद्वारा करतारपूर साहिब येथे जाऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांसोबत करतारपूरला भेट देणाऱ्यांमध्ये सिद्धू यांचा समावेश नव्हता. भारत-पाकिस्तान दरम्यानचा करतारपूर कॉरिडॉर खुला झाल्यापासून भारतातून करतारपूरला भाविकांच्या तीन तुकड्यांनी भेट दिली. यातील तिसऱ्या तुकडीत सिद्धू यांचा समावेश होता.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे व्हीआयपींची मोठी यादी पाठवली होती. या यादीतील सर्वांना कॉरिडॉर खुला होताच पहिल्या दिवशी दर्शन घेण्याची इच्छा होती. केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरक्षेच्या कारणामुळे सर्व व्हीआयपींना पहिल्या तुकडीत पाठवण्याऐवजी तीन तुकड्यांमध्ये विभागून पाठवण्याचा निर्णय घेतला. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालय आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांनी परस्पर चर्चेतून व्हीआयपींना तीन तुकड्यांमध्ये विभागल्याचे समजते. यातील पहिल्या तुकडीत पंजाबचे मुख्यमंत्री आणि तिसऱ्या तुकडीत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धू यांचा समावेश करण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी