Delhi BMW Accident: राजधानी दिल्लीत BMW चा मोठा अपघात, माजी आमदाराचा प्रताप; तीन गाड्यांना धडक

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 07, 2022 | 14:03 IST

BMW Accident Video: या अपघातात तीन वाहनांची टक्कर झाली आहे. यात काही लोक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

BMW Accident Video
दिल्लीत शनिवारी रात्री बीएमडब्ल्यू कारचा मोठा अपघात 
थोडं पण कामाचं
  • दिल्लीत शनिवारी रात्री बीएमडब्ल्यू कारचा मोठा अपघात झाला आहे.
  • या अपघातात तीन वाहनांची टक्कर झाली आहे.
  • यात काही लोक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली: Delhi BMW Accident Latest Update: दिल्लीत शनिवारी रात्री बीएमडब्ल्यू कारचा मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीएमडब्ल्यू कार मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) माजी आमदार सुनील जैन (Ex MLA Sunil Jain) यांची होती. या अपघातात तीन वाहनांची टक्कर झाली आहे. यात काही लोक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

बीएमडब्ल्यूने अनेक गाड्यांना धडक देणारा ड्रायव्हर मध्य प्रदेशातील सागरचा रहिवासी आहे. यापूर्वी ड्रायव्हर आमदारही होता. घटनेच्या वेळी आमदार स्वतः कार चालवत होते. या अपघाता प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गीता कॉलनी उड्डाणपुलावर हा अपघात झाला. सफेद रंगाच्या बीएमडब्ल्यू कारनं धडक दिल्या काही जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी भादंवि कलम 279/337  अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा-  राज्यात पावसाचं कमबॅक, पुढचे चार दिवस'या' जिल्ह्यांना काढणार झोडपून; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

कारनं वॅगनआर कार आणि स्कूटीला दिली धडक

मिळालेल्या माहितीनुसार, बीएमडब्ल्यू कारने वॅगनआर कार आणि स्कूटीला धडक दिली. यानंतर वॅगनआर कार आणि स्कूटीवर असलेले लोकं जखमी झाले. याव्यतिरिक्त बीएमडब्ल्यूनं एका किआ कारला ही धडक दिली. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

या अपघातात 5 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बीएमडब्ल्यूनं धडक दिलेल्या वाहनांचा स्फोट झाला आहे. तर बीएमडब्ल्यू कारचंही नुकसान झालं आहे. या अपघातामुळे बीएमडब्ल्यू कारशी संबंधित जुन्या भीषण अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी