लता मंगेशकर यांच्या नावे तयार होणार नवा घाट

Lata Mangeshkar: राम नगरी अयोध्येत बांधण्यात येणारा लता मंगेशकर घाट अनेक अर्थांनी खास आहे. जागतिक स्पर्धेद्वारे डिझाईन अंतिम झाल्यानंतर या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

new ghat intersection will be named after lata mangeshkar some saints object and some support
लता मंगेशकर यांच्या नावे तयार होणार नवा घाट  |  फोटो सौजन्य: BCCL

Lata Mangeshkar Ghat: शरयू नदी  किनार्‍याजवळ गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या नावे घाट बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्याच्या डिझाइनसाठी जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये यूपी, महाराष्ट्र आणि गुजरातसह देशातील विविध राज्यांतील 56 वास्तुविशारद आणि कलाकार सहभागी झाले होते. 

या ऑनलाइन स्पर्धेत टॉप ५ जणांची निवड करून त्यांना सीएम योगी आदित्यनाथ यांच्यासमोर सादर करण्यात आले. ज्यामध्ये एक डिझाइन निवडण्यात आले आहे. आता त्याचे बांधकाम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी