News Ki Pathshala शेतकरी आंदोलनातून नेते चमकले, शेतकऱ्यांना काय मिळाले?

News Ki Pathshala one year of Farmers Protest What Modi government did for the farmers केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मागील वर्षभरात काय केले? शेतकऱ्यांच्या आंदोलनाची गरज आहे का? यासह अनेक प्रश्नांवर 'टाइम्स नाउ नवभारत'च्या (Times Now Navbharat) 'न्यूज की पाठशाला' (News Ki Pathshala) या कार्यक्रमात सविस्तर उहापोह झाला.

News Ki Pathshala one year of Farmers Protest What Modi government did for the farmers
News Ki Pathshala शेतकरी आंदोलनातून नेते चमकले, शेतकऱ्यांना काय मिळाले? 
थोडं पण कामाचं
  • News Ki Pathshala शेतकरी आंदोलनातून नेते चमकले, शेतकऱ्यांना काय मिळाले?
  • केंद्र सरकारने एका वर्षात काय केले?
  • शेतकरी सन्मान निधी

News Ki Pathshala one year of Farmers Protest What Modi government did for the farmers नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाला एक वर्ष होऊन गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकार सादर करणार आहे. हा प्रस्ताव सादर करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने औपचारिक मंजुरी दिली आहे. पण शेतकरी नेत्यांनी अद्याप आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केलेली नाही. किसान मोर्चाच्या २७ नोव्हेंबरच्या (शनिवार २७ नोव्हेंबर २०२१) बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवू असे शेतकरी नेत्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांचे नेते एमएसपी हमीच्या कायद्यासह सहा मागण्यांवर कायम आहेत. आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले. या आंदोलनात आजही रस्त्यांवर प्रामुख्याने हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांतील निवडक जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मागील वर्षभरात काय केले? शेतकऱ्यांच्या आंदोलनाची गरज आहे का? यासह अनेक प्रश्नांवर 'टाइम्स नाउ नवभारत'च्या (Times Now Navbharat) 'न्यूज की पाठशाला' (News Ki Pathshala) या कार्यक्रमात सविस्तर उहापोह झाला.

केंद्र सरकारने एका वर्षात काय केले?

MSP - उत्पादन खर्चाच्या दीडपट दिले
कृषी बजेट पाच पटीने वाढवले
दरवर्षी कृषी क्षेत्रासाठी सव्वालाख कोटींच्या खर्चाचे नियोजन
पीक कर्ज (Crop Loan/ क्रॉप लोन) दुप्पट दिले
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून ६ हजार ८४५ कोटी रुपये दिले

MSP आधारे केलेली खरेदी २०२०-२१

गहू - ४३३ लाख मे. टन
८५ हजार ५८० कोटी रुपये
धान्य (धान) - ८६९ लाख मे. टन
१ लाख ६४ हजार कोटी रुपये

१ लाख कोटी रुपयांचा अॅग्रीकल्चर इन्फ्रा फंड
कोल्ड स्टोरेज, बाजार विकास यासाठी ४३८९ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

शेतकरी सन्मान निधी (किसान सम्मान निधि)

सातवा हप्ता - डिसेंबर ते मार्च २०२०-२१
१० कोटी २३ लाख ४७ हजार ६६ शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले प्रत्येकी २ हजार रुपये
आठवा हप्ता - एप्रिल ते जून २०२१-२२
११ कोटी १० लाख ५७ हजार २५१ शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले प्रत्येकी २ हजार रुपये
नववा हप्ता - ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२१-२२
१० कोटी ९६ लाख ७८ हजार १७८ शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले प्रत्येकी २ हजार रुपये

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी