'2014चे हिरो 2024 मध्येही विजेते होतील?', शपथ घेताच नितीश कुमारांचा मोदींना बोचरा सवाल

Nitish Kumar attack Narendra Modi : बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची आठव्यांदा शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितीश म्हणाले की, 2014 मध्ये जे विजयी झाले ते 2024 मध्ये विजयाची नोंद करू शकतील?

nitish kumar challenge to modi as soon as he took oath asked will heroes of 2014 be able to become winner in 2024 as well
'2014चे हिरो 2024 मध्येही विजेते होतील?', शपथ घेताच नितीश कुमारांचा मोदींना बोचरा सवाल 
थोडं पण कामाचं
  • नितीश कुमार 8व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री
  • शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला हल्लाबोल
  • 2014 च्या निवडणुकीत जे जिंकले ते 2024 मध्ये परत येऊ शकतील का?, नितीश कुमारांचा सवाल

Nitish Kumar: पटना: बिहारचे मुख्यमंत्री (Bihar CM) म्हणून आठव्यांदा शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितीश कुमार यांनी यांनी 2014 मध्ये सत्तेत आलेल्यांचा 2024 मध्येही विजय होणार का? असा थेट सवाल करत पंतप्रधान मोदींना (PM Modi) चँलेज दिलं आगे. नितीश कुमार म्हणाले की, ते पंतप्रधानांसह अशा कोणत्याही पदासाठी उमेदवार नाहीत. पण 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी विरोधकांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा आहे. नितीश यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा भाजपसोबतची मैत्री तुटण्यामागे त्यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. (nitish kumar challenge to modi as soon as he took oath asked will heroes of 2014 be able to become winner in 2024 as well)

22 वर्षात 8 वेळा झाले मुख्यमंत्री 

राज्यपाल फागू चौहान यांनी बुधवारी राजभवनात नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाची आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. नितीश कुमार हे गेल्या 22 वर्षात 8 वेळा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. नितीशकुमार यांनी बुधवारी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. यासोबतच त्यांनी 164 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रही राज्यपालांना सादर केले.

अधिक वाचा: २०२४ मध्ये पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींसमोर नितीश कुमार यांचं आव्हान? पाहा VIDEO

नितीश यांनी भाजपपासून फारकत घेण्याबाबत स्पष्टीकरणही दिले. ते म्हणाले की, 'जेडीयूच्या बैठकीत आमदार आणि खासदारांनी युती तोडण्याबाबत चर्चा केली.'

भाजप-जेडीयूमध्ये सुरु होती धूसफूस

जेडीयूमे भाजपपासून वेगळं होण्याबाबतच्या मुद्द्याविषयी आता वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, 2020 मध्ये सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि जेडीयूमध्ये बरीच धुसफूस सुरु होती.\

अधिक वाचा: Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; भाजपला हादरवलं

विधानसभा निवडणुकीत जेडीयूचा पराभव करण्यासाठी आणि अधिक जागा जिंकण्यापासून रोखण्यासाठी भाजपने चिराग पासवान यांना पुढे केले, असे स्थानिक नेत्यांचे मत आहे. चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला निवडणुकीत मोठा फटका बसला. सूत्रांच्या मते, नितीशकुमार यांच्या मनात चिरागला पुढे करुन जी खेळी खेळली गेली ती त्यांना मागील काही दिवसांपासून अधिक सलत होती. 

याशिवाय सीएम नितीश यांच्या विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्याशी झालेल्या भांडणानेही दोन्ही पक्षांच्या नात्यात तणाव निर्माण करण्याचे काम केले. याचवेळी आरसीपी सिंग यांच्या मुद्द्यावरुन नितीश कुमार यांना भाजपपासून वेगळं होण्याचं ठोस कारण मिळालं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी