पाकिस्तान : कराचीत बॉम्बस्फोट, एक ठार आणि १३ जखमी

One killed and 13 injured as explosion rips through Karachis Saddar area in Pakistan : पाकिस्तानची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरविणाऱ्या कराचीमध्ये गुरुवार १२ मे २०२२ रोजी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला आणि १३ जण जखमी झाले.

One killed and 13 injured as explosion rips through Karachis Saddar area in Pakistan
पाकिस्तान : कराचीत बॉम्बस्फोट, एक ठार आणि १३ जखमी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तान : कराचीत बॉम्बस्फोट, एक ठार आणि १३ जखमी
  • बॉम्बस्फोट कराचीच्या सदर भागातील एका सायकलवर ठेवलेल्या पिशवीत झाला
  • सायकलवर ठेवलेल्या पिशवीत आईडी

One killed and 13 injured as explosion rips through Karachis Saddar area in Pakistan : कराची : पाकिस्तानची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरविणाऱ्या कराचीमध्ये गुरुवार १२ मे २०२२ रोजी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला आणि १३ जण जखमी झाले. जखमींवर जिना हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉम्बस्फोट कराचीच्या सदर भागातील एका सायकलवर ठेवलेल्या पिशवीत झाला. स्फोट झाला त्या भागातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलीस तपास सुरू आहे. सदर भागात बॉम्बस्फोटानंतर आसपासच्या इमारतींमधील खिडक्यांच्या आणि वाहनांच्या काचा फुटल्या.

सायकलवर ठेवलेल्या पिशवीत आईडी (Improvised Explosive Device - IED) होता. या आईडीचा टायमर लावून स्फोट करण्यात आला. स्फोटामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. तटरक्षक दलाचे एक वाहन बॉम्बस्फोट झाला त्यावेळी सदर भागात होते. हे वाहन आणि त्याचा चालक तसेच वाहनातील प्रवासी सुरक्षित आहेत. पण या वाहनाला लक्ष्य करण्याच्या उद्देशानेच परिसरात बॉम्बस्फोट करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी