'या' सरकारने केली २५ रुपये किलो कांदा देण्याची घोषणा 

Onion at Rs 25 per kg: कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर कांदा १२० ते १५० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्याच दरम्यान २५ रुपये किलो दराने कांदा विकण्याची घोषणा एका सरकारने

onion price rs 25 per kg andhra pradesh marathi news
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • देशातील विविध भागात कांदा १२० रुपये ते १५० रुपये प्रति किलो दराने होतेय विक्री 
  • सरकारकडून कांद्याचे दर कमी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु
  • कांद्याचे दर वाढल्याने नागरिक हैराण

विजयनगरम: देशभरात कांद्याचे दर वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. वाढत्या महागाईत कांदाही महागल्याने गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कांदा स्वस्तात उपलब्ध व्हावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याच दरम्यान आंध्रप्रदेशातील विजयनगरम येथे सरकारकडून स्वस्त दरात कांदा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. स्वस्तात कांदा मिळत असल्याचं ऐकून तेथे खरेदीसाठी महिलांनी एकच गर्दी केली.

आंध्रप्रदेशातील विजयनगरम येथे सरकारकडून दररोज प्रति व्यक्ती २५ रुपये किलोग्रॅम दराने कांदा विक्री करण्याची घोषणा करण्यात आली. स्वस्तात कांदा विक्री होत असल्याची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आणि खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. गर्दी पाहून सर्वांना एका रांगेत उभे राहण्यास सांगितले मात्र, त्यासाठीही घटनास्थळावरची जागा कमी पडली. एक किलो कांदा खरेदीसाठी नागरिक अनेक तास रांगेत उभे राहिल्याचं दिसून आलं.

यापूर्वी बिहारची राजधानी पाटणा येथे सुद्धा एका स्टॉलवर स्वस्तात कांदा विक्री होत होती. तेथे सुद्धा नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आणि रांग लावली होती. स्वस्तात कांदा खरेदीसाठी स्टॉल सुरु होण्यापूर्वीच नागरिक घटनास्थळावर गर्दी करत होते. नागरिकांची गर्दी पाहून तेथील प्रशासनालाही आश्चर्याचा धक्काच बसला होता. येथे कांदा ३५ रुपये किलो या दराने विक्री केला जात होता. 

देशातील अनेक बाजारपेठांत कांदा १५० रुपये किलो दराने विकला जात आहे तर काही ठिकाणी १२० ते १३० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. वाढत्या दरांमुळे हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या ताळीतून कांदा गायब केल्याचंही अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी