Pakistan is bankrupt : पाकिस्तान दिवाळखोर झाला आहे, संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली

Pakistan defence minister admits nation already gone bankrupt, says IMF has no solution for its problems : पाकिस्तान हा देश दिवाळखोर झाला आहे. आता आयएमएफकडून (International Monetary Fund - IMF) आर्थिक मदत मिळवली तरी संकट टळणार नाही, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली.

Pakistan is bankrupt
पाकिस्तान दिवाळखोर झाला आहे, संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तान दिवाळखोर झाला आहे
  • पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
  • अमेरिकेच्या एका डॉलरसाठी पाकिस्तानचे 260 रुपये 40 पैसे मोजावे लागतात

Pakistan defence minister admits nation already gone bankrupt, says IMF has no solution for its problems : पाकिस्तान हा देश दिवाळखोर झाला आहे. आता आयएमएफकडून (International Monetary Fund - IMF) आर्थिक मदत मिळवली तरी संकट टळणार नाही, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली. ते सियालकोट येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होते.

पाकिस्तानसमोर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे आयएमएफ किंवा इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने मिळणार नाहीत. ही उत्तरे मिळवण्यासाठी पाकिस्तानला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील, असे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले.

आंतरराष्ट्रीय चलन विनिमय दरानुसार अमेरिकेच्या एका डॉलरसाठी पाकिस्तानचे 260 रुपये 40 पैसे मोजावे लागतील अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानमध्ये 1 लिटर पेट्रोल 272 रुपयांत, 1 लिटर हायस्पीड डिझेल 280 रुपयांत आणि 1 लिटर लाइट डिझेल 196.68 रुपयांत उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये 1 लिटर केरोसिनसाठी (घासलेट किंवा रॉकेल) 202 रुपये 73 पैसे मोजावे लागत आहेत. 

सध्याच्या आर्थिक संकटासाठी पाकिस्तानमधील राजकारणी, लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी अशा सर्वांचा भ्रष्टाचार आणि चुकीची कार्यपद्धती जबाबदार आहे. पाकिस्तानमधील कोणतीही यंत्रणा आर्थिक शिस्तीचे पालन करत नाही. देशात ठिकठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, असेही संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले.

Petrol Pump Fraud : सावधान, पेट्रोल पंपावर सुरू आहे फसवणूक, नुकसान टाळण्यासाठी हा आहे उपाय

दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये हिंसेचे थैमान घातले आहे. पोलीस आणि सैनिक दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. पण परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कराची ही पाकिस्तानची आर्थिक राजधानी समजली जाते. पण कराचीतच पोलीस मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. देशात इतर अनेक ठिकाणी दहशतवादी कारवाया सुरू आहेत. या घडामोडींमुळे पाकिस्तानमध्ये वातावरण अस्थिर झाले आहे. 

Magha Amavasya : माघ अमावस्या म्हणजे काय?

अनेक पदार्थांची टंचाई, वाढती महागाई आणि दहशतवादी हल्ले यामुळे पाकिस्तानमध्ये जगणे सामान्यांसाठी कठीण झाले आहे. या बिकट परिस्थितीतून कधी तरी बाहेर पडू अशी आशा पाकिस्तानचे नागरिक बाळगून होते. पण आता पाकिस्तान सरकारचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी हताश होऊन दिवाळखोरीची कबुली दिली. या कबुलीमुळे पाकिस्तानपुढील प्रश्न आणखी बिकट आणि गुंतागुंतीचे झाल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी