अखेर पाकिस्तानने मान्य केलं सत्य

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 10, 2019 | 20:15 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी ४२व्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परषदेच्या बैठकीत एक मोठं वक्तव्य केलं आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं वक्तव्य शाह महमूद कुरैशी यांनी म्हटलं आहे.

Pakistan admits Jammu and Kashmir is Indian state
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानने जम्मू-काश्मीर संदर्भात मान्य केलं सत्य
  • जम्मू-काश्मीर भारताचाच भाग - पाकिस्तान
  • पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी यूएनएसआरसीमध्ये मान्य केलं सत्य

जिनेवा: जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग असला तरी पाकिस्तान नेहमीच आपला दावा करत आला आहे. मात्र, आता पाकिस्तानने जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग असल्याची कबुली दिली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (यूएनएचआरसी)च्या बैठकीत ही कबुली दिली आहे. 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी ४२व्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेला (UNHRC) संबोधित करत असाताना जम्मू-काश्मीर भारताचाच भाग असल्याचं म्हटलं आहे. यामुळे भारताचा एक मोठा विजय झाला आहे तर यापूर्वी काश्मीर प्रश्नावरुन पाकिस्तानने केलेल्या आरोपांची पोलखोल झाली आहे.

पाकिस्तानने यापूर्वी जम्मू-काश्मीर आपला असल्याचा दावा करत भारतावर अनेक आरोप केले आहेत. तसेच वारंवार खोटंही बोललं आहे. मात्र, आता पाकिस्तानचेच परराष्ट्र मंत्री कुरैशी यांनी जगासमोर सत्य स्वीकारलं आहे आणि जम्मू-काश्मीर भारताचाच भाग असल्याचं मान्य केलं आहे. तब्बल ७० वर्षांनी पाकिस्तानने हे सत्य स्वीकारलं आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असलेले शाह महमूद कुरैशी हे वरिष्ठ राजनेता आहेत. आपल्या सुविधेनुसार आपली भूमिका बदलणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. आता त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू-काश्मीर भारताचाच भाग असल्याचं मान्य केलं आहे. पाकिस्तानला सुद्धा आता जाणवू लागलं आहे की काश्मीरचा मुद्दा त्यांच्या हातून निसटत चालला आहे.

यूएनएचआरसीच्या एका सत्राला संबोधित करत असाताना शाह महमूद कुरैशी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. काश्मीरमध्ये नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप भारतावर केला. तर, काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला यापूर्वीच संयुक्त राष्ट्रात निराशा मिळाली आहे. चीनच्या मदतीने संयुक्त राष्ट्राची बैठक बोलावण्यात पाकिस्तानला अपयश आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अखेर पाकिस्तानने मान्य केलं सत्य Description: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी ४२व्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परषदेच्या बैठकीत एक मोठं वक्तव्य केलं आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं वक्तव्य शाह महमूद कुरैशी यांनी म्हटलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी