पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हाती चिनी शस्त्रास्त्रे

Pakistan sponsored terrorists using chinese arms and ammunition जम्मू काश्मीरमध्ये हिंसेचे थैमान घालणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना चिनी शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू आहे.

Pakistan sponsored terrorists using chinese arms and ammunition
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हाती चिनी शस्त्रास्त्रे 

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हाती चिनी शस्त्रास्त्रे
  • चीनच्या नोरिंको कंपनीची शस्त्र दहशतवाद्यांच्या हाती
  • भारतीय सुरक्षा पथकांनी दहशतवाद्यांना ठार करुन तसेच तपासणी करुन जप्त केली चिनी शस्त्र

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमध्ये हिंसेचे थैमान घालणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना चिनी शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानचे लष्कर चीनकडून मिळालेली आधुनिक शस्त्र दहशतवाद्यांना पुरवत आहे. तसेच पाकिस्तान दहशतवाद्यांना चिनी शस्त्रे हाताळण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. (Pakistan sponsored terrorists using chinese arms and ammunition)

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या सीमावर्ती परिसरात अनेक ठिकाणी जंगल, नदी, नाले, ओढे आहेत. या परिसरात रात्रीच्यावेळी लपूनछपून घुसखोरी करणे शक्य आहे. अनेकदा पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय सैनिकांच्या दिशेने गोळीबार अथवा मॉर्टरद्वारे मारा सुरू करतो. गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात भारतीय सैनिक गुंतले असताना जंगलातून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी भारतात प्रवेश करतात. पाकिस्तानची ही पद्धत लक्षात आल्यामुळे आता भारत एकाचवेळी पाकिस्तानला प्रत्युत्तर देत घुसखोरांना थोपवत असतो. पण ही मोहीम प्रत्यक्षात कठीण आहे. काही वेळा घुसखोर घुसखोरी करतात तर काही वेळा त्यांना थोपवण्यात अथवा ठार करण्यात भारतीय सैनिक यशस्वी होतात. या संघर्षात अलिकडच्या काळात भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या हाती चिनी आधुनिक शस्त्रास्त्रे आढळली आहेत. भारताने ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवून दहशतवाद्यांचा बीमोड सुरू केला आहे. दहशतवाद्यांजवळची चिनी शस्त्र पुरावा म्हणून जप्त केली जात आहेत.

सध्या भारत-चीन सीमेवर तणाव आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर सैनिक नियुक्त आहे. याच कारणामुळे पाकिस्तान काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी पाठवून हिंसक कारवाया करण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीरमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून बर्फ पडण्यास सुरुवात होते. बर्फ पडू लागल्यावर घुसखोरी करणे कठीण होते. ही बाब लक्षात घेऊन पाकिस्तानचे लष्कर जास्तीत जास्त दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याच्या प्रयत्नात आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचे लष्कर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानचे डावपेच लक्षात आल्यामुळे दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी तसेच पाकिस्तानच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैनिक सज्ज आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तान दहशतवाद्यांना पुरवत असलेली चिनी शस्त्रे मोठ्या प्रमाणावर जप्त होत आहेत. 

जप्त झालेल्या चिनी शस्त्रांमध्ये नोरिंको (NORINCO) कंपनीने तयार केलेली ईएमईआय टाइप ९७ एनएसआर रायफल (EMEI 97 NSR) आणि तिच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या आहेत. ईएमईआय टाइप ९७ एनएसआर रायफल चिनी सैनिक वापरतात. तसेच चीनमध्ये तयार झालेले हेक्साकॉप्टरही जप्त झाले आहे. भारतीय सुरक्षा पथकाने २३-२४ सप्टेंबरच्या रात्री जम्मू-दक्षिण काश्मीर रस्त्यावर एक महिंद्रा बोलेरो कारर अडवून तपासली. या कारमध्ये नोरिंको कंपनीने तयार केलेली ईएमईआय टाइप ९७ एनएसआर रायफल आणि तिच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा साठा सापडल्या. तसेच एक एके ४७ रायफल आणि तिच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा साठा सापडला. एके ४७ रायफलच्या १९० राउंड तसेच २१८ राउंडचे भरलेले (लोडेड) चार मॅगझिन आणि तीन हँड ग्रेनेड (हात बॉम्ब) जप्त करण्यात आले. दहशतवाद्यांसाठी हा शस्त्रसाठा पाकिस्तानने ड्रोनच्या मदतीने जंगलात टाकला होता.

जम्मू काश्मीर पोलिसांनी अलिकडेच एक पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तान ड्रोनचा वापर शस्त्र पुरवठ्यासाठी करत असल्याचे सांगितले होते. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर काही दिवसांतच शस्त्रसाठा जप्त झाला. सुरक्षा पथकाने १८ सप्टेंबर रोजी राजौरीमध्ये नियंत्रण रेषेजवळ दोन एके ५६ रायफल, दोन पिस्तुल आणि चार हँडग्रेनेड जप्त केले होते. तसेच १४ सप्टेंबर रोजी किशनगंगा नदीजवळ दहशतवाद्यांकडून नोरिंको कंपनीने तयार केलेली क्यूबीझेड ९५ रायफल (QBZ 95) आणि इतर शस्त्रास्त्रे जप्त केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी