Rajasthan: बाडमेरमध्ये हवाई दलाचं MiG-21 कोसळलं, दोन्ही पायलट शहीद

Rajasthan Plane Crash: राजस्थानच्या बाडमेरमध्ये लष्कराचं मिग-२१ विमान कोसळून त्यात दोन पायलटचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच समोर आलं आहे.

plane crash reported in bhimra village in rajasthan one of the pilots lost his life
Rajasthan: बाडमेरमध्ये हवाई दलाचं MiG-21 कोसळलं, दोन्ही पायलट शहीद 
थोडं पण कामाचं
  • राजस्थानच्या बाडमेरमध्ये विमान अपघात
  • अपघातानंतर विमानाला लागली आग
  • प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमानात होते दोन पायलट

Plane Crash: बाडमेर: राजस्थानमधील (Rajasthan) बाडमेरमध्ये (Barmer) अगदी काही मिनिटांपूर्वीच हवाई दलाचं मिग-२१ (MiG-21) हे लढाऊ विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. बाडमेरमधील भीमडा गावात हा अपघात झाला असल्याचं समजतं आहे. या अपघातानंतर आग आणि धुराचे प्रचंड लोळ उठले आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहे. (plane crash reported in bhimra village in rajasthan one of the pilots lost his life)

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या विमानात एकूण 2 पायलट होते आणि अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे काही व्हिडिओ आता समोर आले असून आपण अपघाताचा नेमका अंदाज त्यावरुन लावू शकतो.

विमान कोसळल्यानंतर त्याला भीषण आग लागली. विमान अपघातात दोन्ही वैमानिक शहीद झाले आहेत. यापैकी एका पायलटचा मृतदेह पूर्णपणे जळाला आहे. तर दुसऱ्या पायलटच्या शरीराचे अनेक तुकडे झाले आहेत.

दरम्यान, राज्यस्थानमधील प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून मदतीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं आहे. सुरुवातीला हे नेमकं कोणतं विमान होतं याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नव्हती. मात्र, नंतर हे हवाई दलाचं विमान असल्याचं समोर आलं आहे.

अधिक वाचा: Indapur plan crash : इंधन संपले आणि विमान थेट कोसळले इंदापूर इंदापूरमधील शेतात

कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश

राजस्थानमधील बाडमेर येथे झालेल्या मिग 21 विमान अपघात प्रकरणातील अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय वायुसेनेच्या ट्विन सीटर मिग-21 ट्रेनर विमानाने आज संध्याकाळी राजस्थानमधील उत्तरलाई विमानतळावरून प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. जे रात्री 9.10 च्या सुमारास बारमेरजवळ अचानक कोसळलं.

अपघातानंतर लागली विमानाला आग

विमान कोसळल्यानंतर त्याला भीषण आग लागली. या विमान अपघातात वायू दलाचे दोन्ही वैमानिक शहीद झाले आहेत. दरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी हवाई दलाच्या प्रमुखांकडून मिग दुर्घटनेची माहिती घेतली आहे. भारतीय वायुसेना जीवितहानीबद्दल मनःपूर्वक खेद व्यक्त करते आणि शोकाकुल कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे.

अधिक वाचा: आयला Spicejet चं विमान म्हणजे......हुS श, सकाळी कराची आणि मग मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शोक व्यक्त केला

'हे जाणून खूप दुःख झाले की, बाडमेर येथे एक IAF मिग-21 ट्रेनर विमान क्रॅश झाल्यामुळे दोन IAF वैमानिकांना कर्तव्य बजावताना आपला जीव गमवावा लागला. शोकाकुल कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. ईश्वर हे दु:ख सहन करण्याची त्यांना शक्ती देवो. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.' अशा शब्दात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला.

अधिक वाचा: Nepal Plane Crash: नेपाळमधील विमान अपघातात ठाण्यातील चार जणांसह सर्व प्रवाशांचा मृत्यू

यापूर्वीही अनेकदा झालं आहे मिग क्रॅश 

या प्रकरणाची चौकशी आणि मदत देण्यासाठी प्रशासनाने अधिकारी पाठवले आहेत. यापूर्वीही मिग-21 क्रॅश झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. गेल्या वर्षी बाडमेरमध्येच मिग-२१ क्रॅश झाले होते, पण तेव्हा सुदैवाने दोन्ही पायलट सुरक्षितपणे बचावले होते. यापूर्वी २०२१ मध्ये पंजाबमधील मोगा येथेही मिग-२१ अपघातग्रस्त झालं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी