SCO Summit: मोदींनी केला अफगाणिस्तानमधील कट्टरतेचा उल्लेख

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शांघाय कोऑपरेशन शिखर परिषद (SCO Summit) झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानमधील कट्टरतेचा उल्लेख केला.

PM Modi addressing the SCO Summit
SCO Summit: मोदींनी केला अफगाणिस्तानमधील कट्टरतेचा उल्लेख  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • SCO Summit: मोदींनी केला अफगाणिस्तानमधील कट्टरतेचा उल्लेख
  • कट्टर विचार विकासाच्या मार्गात अडथळा; अफगाणिस्तान हे त्याचे ताजे उदाहरण
  • कट्टर आणि समाजाला घातक विचारांविरोधात संघटितपणे लढण्याची गरज

नवी दिल्ली: व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शांघाय कोऑपरेशन शिखर परिषद (SCO Summit) झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानमधील कट्टरतेचा उल्लेख केला. कट्टर विचारांच्या आणि समाजासाठी धोकादायक असलेल्यांचा बीमोड करण्याची आवश्यकता पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवली. आमच्या भागाला (आशिया खंडाला) कट्टरता हेच मोठे आव्हान असल्याचे मोदी म्हणाले. दहशतवाद आणि कट्टर विचारांच्या विरोधात सर्वांनी संघटितपणे लढण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. PM Modi addressing the SCO Summit

एससीओमध्ये इराणचे स्वागत आहे. सौदी अरेबिया, इजिप्त, कतार या देशांचेही स्वागत आहे. एससीओचा विस्तार या संस्थेचे वाढते महत्त्व आणि वाढत असलेला प्रभाव दर्शवित असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. शांतता, सुरक्षित वातावरण आणि विश्वास यांना आव्हान देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे मूळ कारण वाढते कट्टर अर्थात मूलतत्ववादी विचार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. इस्लाममधील उदारमतवादी, सहिष्णू, सर्वसमावेशक विचारांचे स्वागत करायला हवे. पण कट्टर विचारांविरोधात लढा सुरू ठेवणे आवश्यक आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कट्टर विचार विकासाच्या मार्गात अडथळा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अफगाणिस्तान हे त्याचे ताजे उदाहरण असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

आशिया खंड हा आधुनिक, सुधारणावादी, प्रगतीशील विचारांचा आणि मानवतेचा विचार करणाऱ्या मू्ल्य आणि परंपरांचा परिसर आहे. यामुळेच आशिया खंडाने सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती केली आहे. पण मध्य आशिया खंडातील कट्टर आणि समाजाला घातक विचारांविरोधात संघटितपणे लढण्याची गरज आहे. 

भारतासह एससीओमधील सर्व देशांमध्ये कमी-जास्त प्रमाणात इस्लाम धर्माचे पालन करणारे नागरिक आहेत. त्यांच्या चांगल्या विचारांचा पुरस्कार करायला हवा. या विचारांच्या माध्यमातून एकमेकांना जोडून प्रगतीपथावर वाटचाल केली पाहिजे. पण कट्टतेविरोधात सर्वांनी संघटितपणे लढणे आवश्यक आहे. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याची ही गरज आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. नव्या कतृत्ववान आणि कल्पक तरुण पिढीला विज्ञानवादी होण्यासाठी प्रोत्साहीत करण्याची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. एकमेकांना जोडण्याचे प्रयत्न हे दोन्ही बाजुंनी सकारात्मक पद्धतीने झाले तरच लवकर यशस्वी होऊ शकतात. एकतर्फी प्रयत्नांना तेवढे यश मिळणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सूतोवाच केले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी